एरंडोलात प्रजासत्ताक दिन उत्साहात, आजी-माजी सैनिकांचा सत्कार
जळगाव लाईव्ह न्यूज । २६ जानेवारी २०२२ । एरंडोल येथील नगरपालिकेत प्रजासत्ताक दिनाचा ध्वजारोहण प्रशासक तथा मुख्याधिकारी विकास नवाळे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माजी सैनिक कृष्णा महाजन, रघुनाथ पाडूरंग सुतार,न.पा.सफाई कामगार, राजेश रतन गोंडाले, शाम गेचंद, माजी नगरसेविका जयश्री पाटील, सुरेखा चौधरी, योगेश देवरे, कृणाल महाजन व कार्यायल अधिक्षक हितेश जोगी, डॉ.योगेश सुकटे, डॉ.अजित भट्ट, महेंद्र पाटील, विकास पंचबुध्दे, सौरभ बागड, देवेंद्र शिंदे, विवेक कोळी, विनोद पाटील, भूषण महाजन, अनिल महाजन व प्रियंक जैन उपस्थित होते.
ध्वजारोहणांचा कार्यक्रम झाल्यानंतर एरंडोल शहरातील आजी/माजी सैनिकांचा प्रशासक तथा मुख्याधिकारी विकास नवाळे यांच्या हस्ते वृक्ष रोप व शाल देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर माझी वसुंधरा अभियान २.० व स्वच्छ सर्वेक्षण २०२२ अंतर्गत दि.२३ ते २६ जानेवारी २०२२ या कालावधीत अंजनी नदी स्वच्छता मोहिमेत स्वयंप्रेरणेने सहभागी झालेल्या शहरातील सेवाभावी/सामाजिक संस्था यात बजरंग दल, स्वामी विवेकानंद केंद्र, विश्व हिंदू परिषद स्वामी विवेकानंद केंद्र, योगेश्वरी पंतसंस्था,भाजपा युवा शाखा यांचे प्रतिनिधी, कुलस्वामिनी बचत गट, एरंडोल प्रतिनिधी मोनिका विजय पाटील, गिता विठ्ठल शिंपी माझी वसुंधरा अभियानांतर्गत जास्तीत जास्त E Pledge घेतलेल्या कर्मचारी/ नागरीक यांचा सत्कार डॉ.योगेश सुकटे, सोनी मांगीलाल ठाकरे, कुसुम देविदास पाटील, महेंद्र निंबा पाटील, माझी वसुंधरा अभियानांतर्गत वृक्ष गणना राहुल मनोज लोहार, घनकचरा डेपो वृक्ष संगोपन युवराज कौतिक सोनवणे यांना सन्मान पत्र व वृक्ष रोप देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमचे सूत्रसंचालन डॉ.योगेश सुकटे यांनी केले.
हे देखील वाचा :
- गोदावरी अभियांत्रिकीत स्वावलंबी भारत अभियानार्तंगत उद्यमिता संमेलन उत्साहात
- जळगावात आणखी एक अपघात; ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार
- जळगाव शहरातील महामार्गावर पुन्हा अपघात; दुचाकीस्वार वृद्धाला अज्ञात वाहनाने चिरडले
- Jalgaon : दुचाकी लांबविणारे दोघे चोरटे पोलिसांच्या जाळ्यात
- Pachora : वाळू माफियांकडून महसूल पथकातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की, चौघांना अटक