धक्कादायक ! हरभरा खाण्याचा बहाणा करून ८ वर्षीय मुलावर अत्याचार

फेब्रुवारी 18, 2022 8:20 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ जानेवारी २०२२ । राज्यासह जिल्ह्यात अत्याचाराच्या घटना सातत्याने घडत असल्याचे दिसून येतेय. अशात शेतात हरभरा खाण्याचा बहाणा करून एका ८ वर्षीय मुलावर एकाने अनैसर्गिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना यावल तालुक्यातील एका गावात घडली असून याबाबत फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime 3 1 jpg webp

फैजपूर पोलीसांच्या माहितीनुसार, तालुक्यातील एका गावात ८ वर्षीय मुलगा आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. १९ जानेवारी रोजी दुपारी १२ ते १२.३० वाजेच्या दरम्यान संशयित आरोपी याने हरभरा खाण्याचा बहाणा करून शेतात नेले. त्या ठिकाणी निर्जळ ठिकाणी नेवून त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. मुलावर अत्याचार करून संशयित आरोपीने कुणाला सांगू नको असा दम दिला. याप्रकरणी मुलाच्या आजीच्या फिर्यादीवरून फैजपूर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी किरण तायडे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि मोहन लोखंडे करीत आहे.

नुकतीच मेहुण्यासह इतर तिन जणांनी केलेल्या अत्याचारातून अपंग महिला ६ महिन्याची गर्भवती राहिली. हा त्रास सहन न झाल्याने पीडीत महिलेने २४ जानेवारी रोजी आत्महत्या केल्याचे उघडकीला आले होते. याप्रकरणी पीडीत मुलीच्या भावाच्या फिर्यादीवरून अडावद पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे देखील वाचा :

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now