जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जानेवारी २०२२ । रावेर तालुक्यातील रणगाव व गहुखेडा गावात आकोडे टाकून वीजचोरी करणाऱ्यांवर महावितरणच्या पथकाने २४ रोजी धडक कारवाई केली. त्यात ९० जणांवर कारवाई झाली आहे.
काही दिवसांपासून रणगाव आणि गहुखेडा येथे गावात वारंवार फ्युज उडणे, अतिभारमुळे तार तुटणे यामुळे रात्री अपरात्री वीजपुरवठा खंडित होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्यामुळे सोमवारी सावदा विभागातील कार्यकारी अभियंता गोरक्षनाथ सपकाळे व उपकार्यकारी अभियंता राजेश नेमाडे यांच्या मार्गदर्शनाखाली, सहायक अभियंता योगेश चौधरी, विशाल किनगे, कनिष्ठ अभियंता मंगेश यादव, सचिन गुळवे यांच्या पथकाने रणगाव व गहुखेडा गावात आकोडे टाकणाऱ्यांवर कारवाई केली. आगामी काळातही कारवाईची मोहीम सुरु राहणार असल्याचे महावितरणचे सहाय्यक अभियंता योगेश चौधरी यांनी सांगितले.
हे देखील वाचा :
- जळगावातील तापमानाचा पारा वाढला, खान्देशात पुढचे तीन दिवस असं राहणार तापमान?
- जळगावात सोन्यासह चांदीचा भाव वाढला; आता १० ग्रॅमचा भाव काय?
- गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी इलाईट पदग्रहण सोहळा
- रोटरॅक्ट क्लब ऑफ डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज इलाईटचा पदग्रहण सोहळा
- सोयाबीन व भरडधान्य खरेदीच्या नोंदणीसाठी मुदतवाढ; शेवटची तारीख काय?