जळगाव लाईव्ह न्यूज । २ मार्च २०२१ । जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून Remdesivir , Tocilizumab , Itolizumab यासारखे कोरोनावर उपचारासाठी आवश्यक असणारे औषधे मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. यावर नियंत्रण आणण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आज एक आदेश जारी केला आहे.
जळगाव जिल्ह्यात कोविड – 19 विषाणूचा संसर्गात वाढ होत असून बाधित / संशयीत रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून बाजारामध्ये काही होलसेल औषधी डिलर्स / औषध विक्रेते यांचेकडून Remdesivir , Tocilizumab , Itolizumab या औषधींचा साठा करुन कृत्रिम टंचाई निर्माण करत असलेबाबत निदर्शनास आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या आदेशात नमूद केले आहे.
होलसेल औषधी डिलर्स / औषध विक्रेते यांचेकडून Rendesivir , Tocilizumab , holizunab या औषधांचा पुरवठा प्राधान्याने शासकीय कोचिड हॉस्पीटल्स , तसेच जिल्हा शल्य चिकित्सक जळगाव यांचेकडून कोविड -19 उपचारासाठी मान्यता दिलेली खाजगी हॉस्पीटल्स , परवानाधारक औषध विक्रेते व शासनमान्य नोंदणीकृत वैद्यकीय व्यवसायी यांनाच करावा तसेच शासन मान्य नोंदणीकृत वैद्यकीय परवानधारक डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय खाजगी व्यक्तीना Remdesivir , Tocilizumab . Itolizumab ही इंजेक्शने उपलब्ध करुन देण्यात येवू नयेत असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.
सदर औषधांचा कृत्रिम टंचाई निर्माण होणार नाही याबाबतची दक्षता होलसेल औषधी डिलर्स / औषध विक्रेते यांनी घ्यायची आहे. वरील बाबींचे पालन होत आहे किंवा नाही याबाबतची खात्री किंवा तपासणी करण्याची जबाबदारी ही औषध निरीक्षक , अन्न व औषध प्रशासन यांची राहील. सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास सदर बाब ही भारतीय दंड संहिता , 1860 ( 45 ) चे कलम 188 , आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 ते 60 व फौजदारी प्रक्रिया संहिता , 1973 मधील तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहणार आहे.