जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जानेवारी २०२२ । धरणगाव ते चोपडा रोडवर दुचाकीला बॅण्डच्या गाडीने धडक दिल्याने देवबा आनंदा माळी या दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी ३.४५ वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात माळी यांच्या पत्नी ज्योती माळी या गंभीर जखमी झाल्या. घटने प्रकरणी गाडीचालक स्वत:हून पाेलिसांत हजर झाला आहे.
शिरपूर येथील देवबा आनंदा माळी व त्यांच्या पत्नी ज्याेती माळी या लग्नासाठी दुचाकी (एमएच- १८, बीक्यू- ७८४१) ने धरणगाव परिसरात आल्या हाेत्या. रविवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास लग्न आटाेपल्यानंतर शिरपूर येथे घराकडे परतीच्या प्रवासाला निघाले. दरम्यान, चाेपडा मार्गावरील राेटवद गावापुढे दुपारी ३.४५ वाजेच्या सुमारास त्यांच्या दुचाकीला मागून येणाऱ्या बॅण्ड पथकाच्या गाडी (एमएच- ४३, एडी- ०१७५) ने जबर धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील देवबा माळी यांच्या डाेक्याला तसेच पायाला गंभीर इजा झाली. तर त्यांची पत्नी ज्याेती माळी या देखील गंभीर जखमी झाल्या. या दाेघांना धरणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. परंतु, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच देवबा माळी यांचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी घाेषीत केले. या प्रकरणी सुभाष माळी यांच्या फिर्यादीवरुन बॅण्ड पथकाच्या गाडीचा चालक व अमळनेर तालुक्यातील हिंगाेणे येथील रहिवासी शालिक देविदास काेळी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गाडीचालक स्वत:हून पाेलिसांत हजर झाला आहे. पोलिस निरीक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे.
हे देखील वाचा :