जळगाव जिल्हापाचोरा
डॉ.अपर्णा देशमुख यांचा विवेकानंद युवा पुरस्काराने सन्मान
जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जानेवारी २०२२ । आभामाया वृद्धाश्रमाच्या संचालिका डॉ. अपर्णा देशमुख यांना पुणे येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीतर्फे महाराष्ट्र प्रांतच्या स्वामी विवेकानंद युवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती महाराष्ट्र प्रांतच्या वतीने दिला जाणारा स्वामी विवेकानंद युवा पुरस्कार आभाळमाया वृद्धाश्रमाच्या संचालिका डॉ. अपर्णा देशमुख यांना प्रांत उपाध्यक्षा अलका पेटकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी प्रांत संघटन मंत्री शरद खाडिलकर, सह कार्यवाह जयंत लोकरे, प्रांत सह कार्यवाह विनायक दंबिर, अश्विनीकुमार उपाध्ये, तुषार जुवेकर, राहुल मंडिकर वडॉ. देशमुख व त्यांच्या माता निर्मला देशमुख, पिता डॉ. अनिल देशमुख, बंधू डॉ. अमित देशमुख व नागरिक उपस्थित होते.
हे देखील वाचा :
- Jalgaon : कुत्र्याच्या कारणावरून दगड, दांडक्याने मारहाण; तिघे जखमी
- जळगावात महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त शस्त्र प्रदर्शन
- Jalgaon : जात प्रमाणपत्र पडताळणी समितीतर्फे त्रुटीपुर्ततेसाठी विशेष मोहिमेचे आयोजन
- वाढत्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर जळगावात पोलीस दलातर्फे हेल्मेट जनजागृती रॅली
- डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात २६ व्या राज्य संयुक्त परिषदेचा शुभारंभ