
जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जानेवारी २०२२ । येथील जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघाच्या अध्यक्षा मंदाकिनी खडसे यांनी पुन्हा आपला अध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्या दीर्घ मुदतीच्या रजेवर होत्या.
जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघाच्या चेअरमन मंदाकिनी एकनाथराव खडसे दिनांक १३ जुलै २०२१ पासून दि.१७ जानेवारी २०२२ पर्यंत दीर्घ मुदतीच्या रजेवर होत्या. त्यांनी दि.१८ जानेवारी रोजी संघाच्या चेअरमनपदाचा पदभार स्वीकारला असून, कामकाज पाहण्यास सुरुवात केली आहे. मधल्या काळात ईडी चौकशीकामी त्यांना मुंबई येथे देखील जावे लागले होते. मंदाकिनी खडसे या रजेवर असल्याने दूध संघाचा पदभार माजी खा.वसंतराव मोरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला होता.
हे देखील वाचा :
- जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले! पहा निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम..
- पाळधी ते तरसोद बायपासवर भीषण दुर्घटना! रेल्वे उड्डाणपुलावरून क्रेन कोसळून चालकाचा मृत्यू..
- जळगावच्या स्टार सिनेमाचे दोन नवीन स्क्रीन प्रेक्षकांच्या सेवेत; मिळणार प्रीमियम अनुभव
- माजी सैनिकांच्या पाल्यांसाठी मोठी बातमी! गुणवंत विद्यार्थ्यांना मिळणार शिष्यवृत्ती; अर्ज कसा कराल?
- नेव्हरे धरणात बुडून ५५ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू; शोधमोहीमेनंतर आढळला मृतदेह





