जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जानेवारी २०२२ । शहरातील कांचन नगर परिसरात राहणाऱ्या ४५ वर्षीय व्यक्तीने शुक्रवारी सायंकाळी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सायंकाळी पत्नी घरी आल्यावर घडलेला प्रकार तिच्या लक्षात आला. प्रवीण शंकर मावळे असे मयताचे नाव आहे.
कांचन नगर परिसरातील विलास चौकाजवळ प्रवीण शंकर मावळे हे पत्नी, मुलासह राहतात. गेल्या काही महिन्यांपासून त्यांची मानसिक स्थिती ठीक नसल्याने ते घरीच होते. त्यांची पत्नी प्रमिला या किराणा दुकानावर तर मुलगा सलून दुकानावर कामाला होते. शुक्रवारी ते नेहमीप्रमाणे कामाला गेलेले होते.
घरात एकट्याच असलेल्या प्रवीण शंकर मावळे यांनी राहत्या घरात दि.२१ रोजी ६ वाजेपुर्वी राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपविले. पत्नी प्रमिला या कामावरून घरी आल्यानंतर घडलेला प्रकार त्यांच्या लक्षात आला. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात सीएमो डॉ.प्राची सुरतवाला यांच्या खबरी वरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार मनोज इंद्रेकर करीत आहेत. मयताच्या पश्चात पत्नी, मुलगा, विवाहित मुलगी असा परिवार आहे.
हे देखील वाचा:
- Gold Rate : जळगावच्या सुवर्णपेठेत एकाच दिवसात सोने-चांदी दरात मोठी वाढ, भाव वाचून फुटेल घाम
- गोदावरी अभियांत्रिकीत स्वावलंबी भारत अभियानार्तंगत उद्यमिता संमेलन उत्साहात
- जळगावात आणखी एक अपघात; ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार
- जळगाव शहरातील महामार्गावर पुन्हा अपघात; दुचाकीस्वार वृद्धाला अज्ञात वाहनाने चिरडले
- Jalgaon : दुचाकी लांबविणारे दोघे चोरटे पोलिसांच्या जाळ्यात