⁠ 
शनिवार, मे 18, 2024

..अखेर पोलीस निरीक्षक धनवडे कंट्रोल जमा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जानेवारी २०२२ । जिल्ह्यातील सहा पोलिस निरीक्षकांच्या गुरुवारी बदल्या करण्यात आल्या. त्यात पहूर पाेलिस ठाण्याचे अरुण धनवडे यांनी कर्तव्यात कसूर केल्याने नियंत्रण कक्षात बदली केली.

सविस्तर असे की, धनवडेंनी अवैध गुरे वाहतूक प्रकरणात पैसे घेतल्याचा आरोप आहे. तशी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यात त्यांचा आवाज ओळखता येत होता. चौकशी करून पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी गुरुवारी धनवडेंची नियंत्रण कक्षात बदली केली. याशिवाय पाच पोलिस निरीक्षकांना प्रशासकीय कारणावरून रिक्त पदांवर नियुक्त करण्यात आले आहे. यात भुसावळ शहर पोलिस ठाण्याचे प्रताप इंगळे यांची पहूरला, आर्थिक गुन्हे शाखेचे गजानन पडघन यांची भुसावळ शहर, भुसावळ बाजारपेठचे दिलीप भागवत यांची आर्थिक गुन्हे शाखा, बाेदवड पोलिस ठाण्याचे राहुल गायकवाड यांची भुसावळ बाजारपेठ तर नियंत्रण कक्षात असलेले राजेंद्र गुंजाळ यांची बोदवड पोलिस ठाण्यात बदली झाली. पाेलिस अधीक्षक डॉ. मुंढेंनी तसे आदेश काढले.

हे देखील वाचा :