जळगाव शहर

जिल्हा शल्य चिकित्सक पदी डॉ.किरण पाटील

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जानेवारी २०२१ । जळगाव जिल्हा ग्रामीण रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांची वैद्यकीय अधिकारी म्हणून रुग्णालयीन प्रशिक्षण केंद्र नाशिक येथे बदली झाली आहे. त्यांच्या जागी धरणगाव ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. किरण पाटील यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत जिल्हा सामान्य रुग्णालयात व्हेंटिलेटर खरेदी प्रकरणात गैरव्यवहाराचा आरोप जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.नागोराव चव्हाण यांच्यावर करण्यात आला होता. याप्रकरणाची चौकशी करुन त्याचा अहवाल जिल्हाधिकार्‍यांनी राज्य शासनाकडे पाठविला होता. तसेच त्यांच्याबाबत तक्रारदारांनी शासनाकडे तक्रारी देखील केल्या होत्या. या सर्व बाबींची दखल घेत शासनाने प्रशासकीय कारण दाखवित डॉ. चव्हाण यांची उचलबांगडी केली आहे. तसेच त्यांच्या जागी डॉ. किरण पाटील यांची वर्णी लागली आहे.

हे देखील वाचा :

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button