जळगाव लाईव्ह न्यूज । १९ जानेवारी २०२२ । आज यावल वकील बार संघात नाशिक पदवीधर मतदार संघाच्या इच्छुक उमेदवार महाराष्ट्र टीचर्स व स्टुडंट्स असोसिएशन च्या राज्याध्यक्षा अॅड.शुभांगीताई विवेक पाटील (सूर्यवंशी) धुळे व त्यांचे सोबत अॅड. विवेक आर सूर्यवंशी (सचिव धुळे बार असोसिएशन धुळे) यांनी भेट दिली. या भेटीदरम्यान राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष तथा छत्रपती शिवाजी महाराज फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अॅड.देवकांत बाजीराव पाटील यांनी यावल बार संघ व राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने त्यांचे स्वागत व सत्कार करत त्यांना पुढील भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

अॅड.शुभांगी पाटील यांनी भेटी प्रसंगी नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक 2023 साठी च्या मतदार नाव नोंदणी जागृती अभियान अंतर्गत आपल्या वकील सभासदांना पदवीधर मतदार नोंदणी चे आवाहन केले व संवाद साधत मतदार नोंदणी सागर फॉर्म भरून घेतले.

या वेळी यावल बार संघाचे अध्यक्ष अॅड.धीरज चौधरी सचिव अॅड.निलेश मोरे अॅड. कुलकर्णी अॅड. के डी पाटील अॅड.राजेजी गडे अॅड. गौरव पाटील अॅड.निवृत्ती पाटील अॅड.खालिद शेख अॅड.नात्थु पाटील, अॅड कवडीवले अॅड गोविदा बारी शेख निजाम शेख रफिक, आदी सर्व वकील बांधव उपस्थित होते. अॅड.राजेजी गडे अॅड.नितीन चौधरी अॅड. गौरव पाटील अॅड.निवृत्ती पाटील अॅड.दत्ता सावकारे, अॅड.खालिद शेखअॅड.नात्थु पाटील, अॅड गोविदा बारी शेख निजाम शेख रफिक आदी सर्व वकील बांधव उपस्थित होते.
हे देखील वाचा :
- २१ ते २३ ऑगस्ट दरम्यान ‘जिगीषा नाट्यसहवास’ चे आयोजन
- JEE अॅडव्हॉन्समध्ये ओम पाटीलची देशपातळीवरील उल्लेखनीय कामगिरी
- मोतीबिंदूमुक्त यावल तालुका अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
- डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्समध्ये राष्ट्रीय हातमाग दिन उत्साहात
- डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात ‘भव्य आरोग्य संपदा शिबिर’











