जळगाव लाईव्ह न्यूज । १९ जानेवारी २०२२ । भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा मृत्यू झाला तर सोबतचा गंभीर झाला. ही घटना आज सकाळी भडगाव आय.टी.आय.जवळ घडलीय. मनोज अजबसिंग पाटील (वय – १७ वर्षे रा. नाचनखेडा, ह.मु.जयकिसान कॉलनी) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. अतिशय मनमिळावू व सुस्वभावी मनोजच्या निधनाने त्याचे कुटूंब आणि मित्र वर्गात अतिशय प्रिय होता.
याबाबत असे की, मनोज पाटील हा भडगाव औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा विद्यार्थी होता. नाचनखेडा येथील शेतकरी कुंटूंबातील मनोज शिक्षणासाठी पाचो-याला काकांकडे रहात होता. मनोज व त्याचा साथीदार हे आज सकाळी पाचोरा येथून आय.टी.आय. ला जात असतांना एका भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात मनोज याचा दुर्दैवी मृत्यू झाला तर सोबत असलेला गंभीर जखमी झाला आहे.
अतिशय मनमिळावू व सुस्वभावी मनोजच्या निधनाने त्याचे कुटूंब आणि मित्र वर्गात अतिशय प्रिय होता. त्याच्या अकस्मात मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे
हे देखील वाचा :
- तलाठी हल्ला प्रकरणातील आरोपींना 24 तासांच्या आत अटक; जिल्हाधिकारींनी दिले कडक कारवाईचे आदेश
- जळगाव शहरात अपघाताची मालिका सुरूच: भीषण अपघातात महिलेचा मृत्यू
- अॅड. प्रवीण चव्हाणांना ‘या’ अटी शर्तीवर अटकपूर्व जामीन मंजूर
- भरधाव कार झाडाला धडकली; रावेरचे तिघे तरुण जागीच ठार
- जळगावत अपघाताची मालिका सुरूच; फुपनगरी फाट्याजवळ भीषण अपघातात दोघे मित्र ठार