जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जानेवारी २०२१ । गेल्या काही दिवसांमध्ये कापसाच्या भावाने उचल खाल्ली असून सध्या कापूस १० हजार रुपये प्रति क्विंटलने विकला जाऊ लागलाय. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी सुखावला आहे. तर दुसरीकडे मात्र, व्यापाऱ्यांमध्ये चिंता आहे. कारण कापसाच्या वाढत्या भावाने दक्षिणेच्या काॅटन लाॅबीकडून भाव नियंत्रणासाठी प्रयत्न सुरू आहेत. भावातील चढउताराचा फटका बसू नये म्हणून जिनिंग उद्याेजकांसाेबत व्यापारी वर्ग चितेत आहे. दरम्यान, आज केंद्रीय वस्त्राेद्याेग मंत्रालयासाेबत काॅटन उद्याेगाशी संबंधित प्रतिनिधींची बैठक हाेणार आहे.
कापूस दरातील तेजीमुळे कापुस प्रक्रिया, टेक्स्टाइल उद्याेगाची चिंता वाढली आहे. कापसाच्या तीव्र टंचाईमुळे उद्याेगांना कापूस गाठी मिळण्यात अडचणी येत आहेत. कापसाचे दर नियंत्रणात आणण्यासाठी कापसावरील १० टक्के आयात शुल्क कमी करून कापूस आयातीचे द्वार सुरू करावे, कापसाला वायदे बाजारातून वगळण्यात यावे, टेक्स्टाइल उद्याेगाला कापूस गाठींचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी केंद्रीय वस्त्राेद्याेग मंत्रालयाने पुढाकार घ्यावा या मागण्या घेऊन काॅटन लाॅबी मैदानात उतरली आहे.
कापूस दरावर नियंत्रणासाठी १७ जानेवारी राेजी केंद्रीय वस्त्राेद्याेग मंत्रालयासाेबत काॅटन उद्याेगाशी संबंधित प्रतिनिधींची बैठक हाेणार आहे. कापूस उद्याेगातील अडचणी, निर्यातबंदी, आयात शुल्क, आतरराष्ट्रीय बाजारातील दर, वाहतूक भाडे या बाबींवर बैठकीत मंथन होणार आहे.
हे देखील वाचा :
- जळगाव जिल्ह्यात मविआला धोबीपछाड! सर्वच ११ जागांवर महायुतीचा विजय निश्चित
- महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचं सरकार? मविआ सर्वात मोठा धक्का, आताची आकडेवारी वाचा
- LIVE : मतमोजणी सुरू : विधानसभा २०२४ निकाल
- धडधड वाढली! पोस्टल मतमोजणी सुरु
- या राशीच्या लोकांना शनिदेवांचा आशीर्वाद लाभणार ; वाचा शनिवारचे राशिभविष्य