गुन्हेजळगाव जिल्हापाचोरा

गर्भपात करुन‎ विवाहितेचा छळ‎; ७ जणांविरोधात गुन्हा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ ‎जानेवारी २०२२ । पाचोरा येथील २१ वर्षीय‎ विवाहितेचा सासरच्या लोकांनी‎ बळजबरीने गर्भपात केल्याचा प्रकार समोर आला आहे. सीमा सागर शिवणेकर‎ असे विवाहित महिलेचे नाव आहे. या प्रकरणी विवाहित महिलेच्या तक्रारीवरून साक्री पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

सविस्तर असे की, पाचोरा येथे राहणाऱ्या सीमा सागर शिवणेकर‎ हिचा सासरच्या लोकांनी‎ बळजबरीने गर्भपात केला. पती‎ मनोरुग्ण असून देखील‎ विश्वासघात करुन सासरच्यांनी‎ तिचा छळ केला. माहेराहून ७ लाख‎ ७० हजार रुपये आणण्याची मागणी‎ करीत मारहाण केली. सीमा यांनी‎ दिलेल्या फिर्यादीवरुन साक्री पोलिस‎ ठाण्यात पती सागर संतोष‎ शिवणेकर, सासू मंगलाबाई, सासरे‎ संतोष लालचंद शिवणेकर, दीर‎ योगेश उर्फ कोमल, मामसासरे‎ विजय ब्राह्मणे, दिप्ती ब्राह्मणे,‎ शिवलाल पुना ब्राह्मणे यांच्याविरुद्ध‎ गुन्हा दाखल करण्यात आला.‎ संशियतांना अटक करावी अशा‎ मागणीचे निवेदन सीमा शिवणेकर‎ यांच्या वडीलांनी जिल्हा पाेलिस‎ अधिक्षकांना दिले आहे.‎

हे देखील वाचा :

Related Articles

Back to top button