जळगाव जिल्हाजळगाव शहर

दीपस्तंभ फाऊंडेशनच्या समिती सदस्यांची निवड

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ जानेवारी २०२२ । शहरातील दीपस्तंभ फाऊंडेशनच्या २०२२ – २३ या वर्षासाठीच्या विविध समित्या व सदस्यांची निवड संस्थेच्या विशेष सभेत एकमताने झाली.

दीपस्तंभ फाऊंडेशनच्या मुख्य सल्लागार समितीमध्ये राज्यसभा सदस्य डॉ.नरेंद्र जाधव, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग सदस्य डॉ. ज्ञानेश्वर मुळे, राज्यसभा सदस्य डॉ. विनय सहस्त्रबुद्धे, नौदलाचे निवृत्त व्हाइस ऍडमिरल सुनील भोकरे, लार्सन अँड टुब्रोचे निवृत्त संचालक एम.व्ही. कोतवाल यांची निवड करण्यात आली आहे. तसेच संस्थेच्या कार्यकारी समितीवर डॉ. अलका मांडके (मुंबई), भरत अमळकर, पुखराज पगारिया, सुशीलकुमार बाफना (जळगाव), दीपक शहा (पुणे), नंदकुमार ढेकणे (बंगलौर), अमित वाईकर (थायलंड), आनंद खोत (ठाणे), प्रशांत देशपांडे, प्रसाद कोकीळ (औरंगाबाद), नविन काळे (मुंबई) या सदस्यांची निवड करण्यात आलेली आहे.

संस्थेच्या संचालक मंडळावर यजुर्वेद्र महाजन, डॉ. राजेश डाबी, डॉ.रेखा महाजन, लक्ष्मण सपकाळे, तेजस कावडीया, डॉ. रूपेश पाटील, शैलेश कोलते, राजेंद्र पाटील, हेमलता अमळकर, संध्या सूर्यवंशी, मीनाक्षी निकम, सविता भोळे या सदस्यांची निवड दोन वर्षांसाठी झाली आहे.

हे देखील वाचा :

Related Articles

Back to top button