जळगाव लाईव्ह न्यूज । १५ जानेवारी २०२२ । सावदा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम दि.१७ जानेवारीपासून हाती घेण्यात येणार आहे. दुरुस्ती सुरु असल्याने पाणीपुरवठा ५ ते ६ दिवस बंद ठेवावा लागणार असल्याची माहिती मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी दिली आहे.
सावदा शहरास पाणी पुरवठा करणारी मुख्य पाईप लाईन सावदा रेल्वे स्टेशन जवळील पूला खाली लिकेज झालेली आहे. त्या पाईप लाईनच्या दुरुस्तीचे कामकाज १७ जानेवारी पासुनसुरू करण्यात येणार आहे. दुरुस्तीच्या कामानिमित्त शहराचा पाणी पुरवठा सुमारे ५ ते ६ बंद करावा लागणार आहे. तरी नागरिकांनी पुरेसा पाणीसाठा करुन ठेवावा व पाण्याचा वापर काटकसरीने करुन नगरपरिषदेस सहकार्य करावे असे आवाहन मुख्यधिकारी किशोर चव्हाण यांनी नागरिकांना केले आहे.
हे देखील वाचा :
- राष्ट्रीय युवा महोत्सव अंतर्गत ‘भारत यंग लीडर्स डायलॉग’ चर्चासत्रात भाग घेण्यासाठी तरुणांना आवाहन
- मुक्ताईनगरमध्ये लागणार धक्कादायक निकाल; संभाव्य आमदार कोण? पाहा..
- उमेदवारांनो मुंबई गाठा! निकलाआधी शरद पवारांच्या महत्त्वाच्या सूचना, वाचा काय आहेत?
- चाळीसगाव मतदारसंघात कोणता आमदार निवडून येणार? पाहा exit Poll
- महाराष्ट्रात कुणाचं सरकार येणार? वाचा सट्टा बाजाराचा अंदाज?..