जळगाव जिल्हाजळगाव शहर

एसटी कर्मचारी संपाबाबत आ.पाटील पाठोपाठ खासदार खडसेंचेही मुख्यमंत्र्यांना पत्र

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । एसटी कर्मचाऱ्यांचा दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या संपाला पाठिंबा देण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील एकही आमदार, खासदार ठोसपणे समोर येत नसल्याने एसटी कर्मचाऱ्यांनी मंगळवारी ‘जळगांव लाईव्ह’कडे नाराजी व्यक्त करत आपल्या मतदारसंघातील लोकप्रतिनिधी पाठिंब्यासाठी पत्र देत नसल्याने आगामी निवडणुकीत आम्ही देखिल आमची ताकद दाखवून देऊ असे म्हणाले होते. दरम्यान मुक्ताईनगर मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील पुढे सरसावुन एसटी कर्मचाऱ्यांच्या समर्थनार्थ ११ रोजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र पाठवले होते.यापाठोपाठ १२ रोजी रावेर मतदार संघाच्या खासदार रक्षाताई खडसे यांनीही राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र पाठवून एसटी कर्मचाऱ्यांना पाठींबा दर्शविला आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे राज्य शासनास विलिनीकरण करणे तसेच कार्यवाही करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे घेण्यात यावे या प्रमुख विषयावर खासदार खडसे यांनी पत्र लिहिले असून कोविड-१९ काळात तसेच आंदोलना दरम्यान राज्यातील जवळ-जवळ ७० एसटी कामगारांनी आत्महत्या केलेल्या आहेत.आपल्या न्याय हक्कासाठी राज्य भर सुरु असलेला हा संप शांततेत सुरू आहे.परंतु महामंडळाकडुन मोजक्या कर्मचाऱ्यांना लक्ष्य करून निलंबित करण्यात येत असून निलंबनाची हि कारवाई अन्यायकारक आहे. राज्यातील एसटी कामगारांच्या मागण्या रास्त असुन महामंडळाबाबत कामगारांमध्ये आक्रोश व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.अनेक वर्षांपासून एसटी कामगार तुटपुंज्या पगारावर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आलेले आहेत.परंतु महागाईच्या आजच्या काळात आर्थिक संकटाला कंटाळून राज्यभरातील ७० कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करुन जीव गमावला.शालेय विद्यार्थी, नोकरदार वर्ग व ग्रामीण भागातील विकासाची नाळ असलेल्या एसटी कामगारांच्या जिवनमानात बदल घडवुन आणण्यासाठी त्यांच्याकडुन होत असलेली विलिनीकरणाची मागणी रास्त असल्याने याबाबत तातडीने निर्णय घेणे गरजेचे आहे.

एसटी वर अवलंबून असलेल्या जनतेचा व कर्मचारी यांच्या परिवाराचा सहानुभूती पुर्वक विचार करुन त्वरीत त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक विचार करुन राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्याकरिता कारवाई व्हावी,तसेच कार्यवाही करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचे निलंबन तात्काळ मागे घ्यावे अशी विनंती खासदार रक्षा खडसे यांनी या पत्राद्वारे मुंख्यमंत्र्यांकडे केली आहे.

एसटी कर्मचाऱ्यांची सोशल मिडिया तुन आर्त हाक : आधीच कोविड १९ काळातील बुडालेल्या रोजगार व सद्य:स्थितीत सुमारे दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या संपामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असुन एकवेळ खाण्या-पिण्याचे वांदे आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधी किंवा परिसरातील दानशुर व्यक्ती किंवा कुणीही याबाबत विचारत नसल्याची खंत कामगारांमध्ये आहे. याबाबतचे व्हाॅट्सऍप स्टेटस् कामगार लावत असुन आपला रोष व्यक्त करीत आहेत.

हे देखील वाचा :

Related Articles

Back to top button