⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | अमळनेर | मारवड ग्रामविकास शिक्षण मंडळ संस्थेच्या अध्यक्षपदी जयवंतराव पाटील

मारवड ग्रामविकास शिक्षण मंडळ संस्थेच्या अध्यक्षपदी जयवंतराव पाटील

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जानेवारी २०२२ । अमळनेर तालुक्यातील मारवड येथील ग्रामविकास शिक्षण मंडळ संस्थेच्या पंचवार्षिक निवडणूक (२०२२ -२०२६) चा निकाल जाहीर झाला. असून, सहकार पॅनलचे संपूर्ण उमेदवार निवडुन आले व अध्यक्षपदी जयवंतराव पाटील निवडून आले.

ग्राम विकास शिक्षण मंडळ मारवड या संस्थेची सन २०२२ ते २०२६ या कालावधी करीता घेण्यात आलेली पंचवार्षिक निवडणुक गुप्त मतदान पध्दतीने रविवार दि.०९ जानेवारी रोजी ग्राम विकास शिक्षण मंडळाच्या शैक्षणिक संकुलात पार पडली. तसेच १० रोजी निवडणुकीची मतमोजणी झाली. त्यात अध्यक्ष पदासाठी जयवंतराव मन्साराम पाटील यांनी ७५० पैकी ५०५ मते मिळाली. तसेच कार्यकारी मंडळ संदस्य मारवड स्थानीक मध्ये देविदास शामराव पाटील ४७५, सुरेश मन्साराम पाटील ४५६, मनोज हिमंतराव साळुखे ४४९, साहेबराव नारायण पाटील ४४९, युवराज काशिनाथ पाटील ४३२ असे मते मिळाली. तसेच कार्यकारी मंडळ सदस्य मारवड जवळील परिसराकरीता महारू रामदास शिसोदे ४६४, चंद्रकांत रामराव शिसोदे ४५६, सुरेश भिमराव शिंदे ४५४, देविदास बारकु पाटील ४४९, तर लोटन शिवदास पाटील ४४३ असे मते मिळाली. असुन सहकार पॅनलचे सर्व उमेदवार निवडुन आले.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून वैजनाथ धनावळे, सहा निवडणूक निर्णय अधिकारी एल.जे.चौधरी, यांनी कामकाज पाहिले तर त्यांना प्रा.देवदत्त पाटील व सचिन पाटील यांनी मदत केली. निवडुन आलेल्या उमेदवारांचे परीसरातुन अभिनंदन होत आहे.

हे देखील वाचा :

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.