जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जानेवारी २०२२ । शहरातील चंदूअण्णानगरात घरासमोर लावलेली दुचाकी ४ रोजी रात्री चोरट्यांनी चोरून नेली आहे. विश्वनाथ कोंडाळकर यांची ही दुचाकी (एमएच-१९, सीटी-०५७७) आहे. या प्रकरणी तालुका पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

अनुराग स्टेट बँक कॉलनीतील हनुमान मंदिराजवळून ४ रोजी माेटारसायकल चोरी झाली. उमेश प्रभाकर मराठे (वय ३२, रा. कांचननगर) यांच्या मालकीची ही दुचाकी आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास चंद्रकांत पाटील हे करीत आहे.

हे देखील वाचा :
- चाळीसगाव लैंगिक अत्याचार प्रकरण; आरोपीला 20 वर्षांचा सश्रम कारावास
- चोपडा हादरले! जन्मदात्या बापाचा दोन मुलांवर कुऱ्हाडीने हल्ला; मुलीचा मृत्यू, मुलगा गंभीर
- जळगावात एमआयडीसी पोलिसांची धडक कारवाई; 80 किलो गोमांस जप्त, चौघे ताब्यात
- जामनेर हादरले ! आंतरजातीय प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाची निर्घृण हत्या
- जळगावात 62.07 ग्रॅम एमडीसह आरोपी जेरबंद; ₹3.58 लाखांचा मुद्देमाल जप्त









