जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जानेवारी २०२२ । यावलात रस्त्याने मोबाईलवर बोलत पायी जाणाऱ्या तरुणाच्या हातातून १२ हजार ४०० रूपये किंमतीचा मोबाईल अज्ञात दोन भामट्यांनी दुचाकीवर येवून हिसकावून नेल्याची घटना ८ रोजी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारा घडली. या प्रकरणी तरुणाच्या तक्रारीवरून येथील पोलीसात अज्ञात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

सविस्तर असे की, मोहम्मद तौफीक इसहाक कच्छी (वय-२१) रा. डागपुरा यावल हा आपल्या कुटुंबियासह वास्तव्याला आहे. शनिवार ८ जानेवारी रोजी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास यावल शहरातील मनुदेवी मंदीराच्या समोर मोहम्मद कच्छी हा मोबाईलवर मित्राशी बोलत असतांना त्याच्या पाठीमागून अज्ञात दोन चोरटे दुकानी येवून हातातील १२ हजार ४०० रूपये किंमतीचा मोबाईल जबरी हिसकावून नेला. आरडाओरड केली परंतू चोरटे मोबाईल घेवून पसार झाले होते. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात रात्री १० वाजता यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले करीत आहे.

हे देखील वाचा :
- चाळीसगाव लैंगिक अत्याचार प्रकरण; आरोपीला 20 वर्षांचा सश्रम कारावास
- चोपडा हादरले! जन्मदात्या बापाचा दोन मुलांवर कुऱ्हाडीने हल्ला; मुलीचा मृत्यू, मुलगा गंभीर
- जळगावात एमआयडीसी पोलिसांची धडक कारवाई; 80 किलो गोमांस जप्त, चौघे ताब्यात
- जामनेर हादरले ! आंतरजातीय प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाची निर्घृण हत्या
- जळगावात 62.07 ग्रॅम एमडीसह आरोपी जेरबंद; ₹3.58 लाखांचा मुद्देमाल जप्त









