⁠ 
रविवार, मे 19, 2024

अडावद येथे 15 ते 18 वयोगटांसाठी लसीकरण

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । डॉ.सतीश भदाणे । चोपडा तालुक्यातील अडावद येथील शामराव येसो महाजन विद्यालयात १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांना कोवॅक्सिंचा पहिला डोस देण्यात आला. यावेळी ६७ विदयार्थी व विद्यार्थिनींनी याचा लाभ घेतला.

सदरचे लसीकरण तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप लासुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. विष्णुप्रसाद दायमा, डॉ.अर्चना पाटिल, आरोग्य सहायक प्रकाश पारधी, आरोग्य सेवक डॉ.महेंद्र पाटिल, विजय देशमुख, आरोग्य सेविका निवेदिता शुक्ल, आशा सेविका शारदा महाजन, हिराबाई माळी यांच्या पथकाने शिबिरासाठी परिश्रम घेतले.

यावेळी मुख्याध्यापक आर.डी.माळी, उपशिक्षक आर.के. पिंपरे, एन.ए.महाजन, व्ही. एम.महाजन, एन.ए. महाजन, एस. जी. महाजन, एम.एन. माळी, पि.आर. माळी, एस. बी. चव्हाण, एस.के. महाजन, पि.एस. पवार, सि. एस. महाजन, ईश्वर मिस्तरी, रवींद्र माळी, अशोक महाजन, कैलास महाजन आदी सर्व शिक्षक शिक्षेतर कर्मचऱ्याचे सहकार्य लाभले.

हे देखील वाचा :