जळगाव जिल्हाजळगाव शहर

महावितरण कर्मचाऱ्यांचे अच्छे दिन, नववर्षात मिळाला ४० हजारापर्यंतचा फरक‎

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ जानेवारी २०२२ । महावितरणकडून सहा महिन्यांच्या‎ पगारवाढीतील फरकातील रकमेच्या‎ रूपाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हातात‎ सुमारे १ लाखापर्यंत तर अभियंत्यांना‎ ६० ते ७० हजार, तृतीय-चतुर्थश्रेणी‎ कर्मचाऱ्यांना साधारणपणे ३० ते ४०‎ हजारांपर्यंतची गंगाजळी हातात पडली‎ आहे.

नववर्षात एकरकमी रक्कम‎ मिळाली आहे. दिवाळीनंतर वर्षाच्या‎ सुरुवातीलाच ही वाढ मिळाल्याने‎ बाजारपेठेत खरेदीची रेलचेल वाढणार‎ आहे.‎ ‎ सप्टेंबर २०१९मध्ये पगारवाढीचा‎ करार झाला होता. यानंतर पहिला व‎ दुसरा हफ्ता प्रशासनाने अदा केला‎ होता. मात्र, मध्यंतरीच्या काळात‎ कोरोनासह मोठ्या प्रमाणात थकबाकी‎ वसुलीअभावी महावितरणची आर्थिक‎ कोंडीत होते. यामुळे तिसरा हफ्ता‎ रखडला होता. मात्र, कर्मचारी‎ संघटनांचे दोन महिन्यांपासून विविध‎ प्रकारचे आंदोलन सुरू होते. याची‎ दखल घेत महावितरण प्रशासनाने या‎ फरकाची रक्कम कर्मचाऱ्यांच्या‎ खात्यात अदा केली असल्याची‎ माहिती महावितरणच्या सूत्रांनी दिली.‎

काम करण्याची‎ स्फूर्ती वाढली‎ फरकाची रक्कम मिळत‎ नसल्याने वर्कर्स फेडरेशनने‎ यासाठी आंदोलन करीत‎ पाठपुरावा सुरू ठेवला‎ होता. याची दखल घेत‎ प्रशासनाने हा निर्णय‎ घेतला, यामुळे‎ कर्मचाऱ्यांमध्ये समाधान‎ व्यक्त होत आहेे .‎ वीरेंद्र पाटील, विभागीय‎ सचिव वर्कर्स फेडरेशन‎ ४०० अभियंत्यांसह अन्य‎ कर्मचाऱ्यांना लाभ‎ आंदोलनानंतर व्यवस्थापन व कर्मचारी‎ संघटना प्रतिनिधींमध्ये झालेल्या‎ चर्चेनंतर १ एप्रिल २०१९ ते ३० सप्टेंबर‎ २०२१ या दरम्यान फरकाची रक्कम‎ देण्याचे लेखी आश्वासन प्रशासनाने‎ दिले होते. या आश्वासनानुसार गुरुवारी‎ ही रक्कम देण्याचा निर्णय झाला. याचा‎ परिमंडळातील ४०० अभियंता, तांत्रिक‎ व कार्यालयीन कर्मचारी ४००, वर्ग तीन‎ व चार ४००० अशा ५२०० कर्मचाऱ्यांना‎ याचा लाभ झाला आहे.‎

हे देखील वाचा :

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button