जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जानेवारी २०२२ । अज्ञात चोरट्यांनी लुटीच्या उद्देशाने चार ते पाच वाहनांवर दगडफेक केल्याची घटना मध्य प्रदेशातील शेरीनाका सीमेच्या पुढे गाडग्याआम ते शिव गुफा फाट्यादरम्यान २ रोजी रात्री १०.४५ वाजेच्या सुमारास घडली. त्यात सावदाच्या एक कुटूंब प्रसंगावधान राखून बचावले. या प्रकरणी पोलिसांत माहिती दिली. त्यांच्या गस्ती वरील पथकाने चार संशयितांना रात्रीच ताब्यात घेतले.
सावदा येथील माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे यांचे बंधू शेखर वानखेडे हे पत्नी, मुलगा व पुतण्या सोबत खासगी वाहनाने (एमएच.१९-सीव्ही. १५४१) रात्री महेश्वर व ओंकारेश्वर येथून खरगोन-पिंपरूड महामार्गाने पालकडे येत होते. मध्य प्रदेशातील शेरी नाका सीमेपलीकडे तीन दुचाकींवर फिरणाऱ्या सहा ते सात भामट्यांनी गोफणीने त्यांच्या कारवर चालकाकडील बाजूने दगडाचा मारा केला. त्यात चालकासमोरील काच व स्पीडोमीटरचे डेस्क फुटले. त्यांच्या पत्नीच्या खांद्यावर दगड आदळून मुका मार लागला. मात्र, प्रसंगावधान राखून त्यांनी वाहन न थांबवता घटनास्थळावरून भरधाव वेगाने पाल-शेरीनाका तपासणी नाका गाठला. तेथे रावेर पोलिसांना माहिती दिली. मात्र, रावेर पोलिसांंकडे पाल औटपोस्टसाठी गस्ती वरील वाहन नाही. तथापि हेलापाडाव (मध्य प्रदेश) पोलिस दूरक्षेत्राचे सहाय्यक फौजदार रमेश पवार यांना रावेर पोलिस स्टेशनचे फौजदार विशाल सोनवणे यांनी घटनेची माहिती दिली.

यानंतर भगवान पुरा पोलिस ठाण्याच्या गस्ती पथकाने घटनास्थळावरून चार संशयितांना एका दुचाकीसह ताब्यात घेतले आहे. हे संशयित उतांबडी (ता.बऱ्हाणपूर) येथील आहे.
हे देखील वाचा :
- चाळीसगाव लैंगिक अत्याचार प्रकरण; आरोपीला 20 वर्षांचा सश्रम कारावास
- चोपडा हादरले! जन्मदात्या बापाचा दोन मुलांवर कुऱ्हाडीने हल्ला; मुलीचा मृत्यू, मुलगा गंभीर
- जळगावात एमआयडीसी पोलिसांची धडक कारवाई; 80 किलो गोमांस जप्त, चौघे ताब्यात
- जामनेर हादरले ! आंतरजातीय प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाची निर्घृण हत्या
- जळगावात 62.07 ग्रॅम एमडीसह आरोपी जेरबंद; ₹3.58 लाखांचा मुद्देमाल जप्त









