जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जानेवारी २०२२ । अमळनेर येथे पत्रकार दिनाचे औचित्य साधून दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती महाराष्ट्र राज्य पत्रकार संघच्या वतीने साजरी करण्यात आली.
या प्रसंगी आ. अनिल पाटील, मा.आ.साहेबराव पाटील, ऍड.ललिता पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासक तिलोत्तमा पाटील, प्रांताधिकारी सीमा आहेरे, तहसीलदार मिलिंद वाघ, पं.स.उपसभापती श्याम आयरे व शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, आ. अनिल पाटील यांनी तालुक्याचे प्रश्न गंभीरपणे समाज मनापर्यंत मांडण्यात पत्रकारांची महत्त्वाची भूमिका बजावली व कोरोना काळात अनेक पत्रकारांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नागरिकांना व प्रशासनाला जे सहकार्य केले. त्याबद्दल सर्व पत्रकारांचे मनापासून आभार मानले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. माजी आ. साहेबराव पाटील यांनी अमळनेर नगर परिषदेमार्फत पत्रकार भवनाला जागा उपलब्ध करून दिलेले आहे. त्या ठिकाणी लवकरात लवकर पत्रकार बंधूंना पत्रकार भवन बांधून सर्व पत्रकार बांधवांचे सोय कशी होईल यासंबंधी मार्गदर्शन केले.
यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ अमळनेर शाखेचे अध्यक्ष डिगंबर महाले यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार करण्यात आला व प्रांताधिकारी सीमा आहेरे यांची नगरपरिषदेच्या प्रशासक पदी शासनामार्फत नियुक्ती झाली. त्याबद्दल सत्कार करण्यात आला सर्व मान्यवरांच्या हस्ते दिव्यलोक तंत्र, लेखनमंच,अटकाव या वृत्तपत्रांच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.
हे देखील वाचा :
- आज धनत्रयोदशी! जाणून घ्या पूजाविधी आणि शुभ मुहुर्त..
- उत्तर महाराष्ट्रातून लोकमत खान्देश पॉलिटिकल आयकॉन पुरस्काराने अमोल शिंदे सन्मानित
- जळगावच्या ज्येष्ठ नागरिकांना आता कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे दर्शन घेण्याची संधी, ६ ऑक्टोबरपर्यंत करा अर्ज
- दहाव्या अजिंठा वेरूळ आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या मानद अध्यक्षपदी प्रसिध्द दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांची नियुक्ती
- ना.गुलाबराव पाटील यांच्या पुढाकाराने 3 हजार वारकऱ्यांना पंढरपूर वारी