गुन्हेभुसावळ

दुचाकीला ट्रकने उडवले; दिव्यांग भाऊ ठार, जखमी बहिणीचा आक्रोश

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जानेवारी २०२१ । महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढत असल्याचे दिसतंय. अशातच भावाचे दिव्यंगत्वाचे प्रमाणपत्र तयार करण्यासाठी नर्स असलेली बहीण त्याला घेऊन मुक्ताईनगर येथील उपजिल्हा रुग्णालयात गेली. घरी परत येत असताना त्यांच्या दुचाकीला मागून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. त्यात अपघातात संतोष निकाळजे या दिव्यांग भावाचा जागीच मृत्यू, तर नर्स असलेली त्यांची बहीण सुनीता सोनवणे ह्या जखमी झाल्या. ही घटना बुधवारी दुपारी महामार्गावरील दीपनगर प्रकल्पाजवळ घडलीय. भावाचा रस्त्यावर पडलेला मृतदेह पाहून बहिणीने हंबरडा फोडला. याप्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत असे की, मुक्ताईनगर येथील उपजिल्हा रुग्णालयात नर्स असलेल्या सुनीता बाजीराव कसबे-सोनवणे (रा. झेडटीएस परिसर, फेकरी शिवार, गोंदिया केबीनजवळ, भुसावळ) ह्या दिव्यांग असलेले त्यांचे भाऊ संतोष तुकडोजी निकाळजे (वय ५६, रा.कोरपावली ता.यावल) यांना घेऊन मुक्ताईनगरला गेल्या होत्या. तेथे बुधवारी दिव्यांग तपासणी शिबिर होते. तेथील काम आटोपून त्या दुपारी राष्ट्रीय महामार्गाने भुसावळकडे येण्यास निघाल्या. दीपनगर प्रकल्पाजवळ आल्यानंतर भुसावळ शहरातील झेडटीसी परिसराकडे जाणाऱ्या रस्त्यावर वळण घेण्यापूर्वी त्यांनी मोपेड दुचाकीचे (क्रमांक एमएच.१९-डीटी.२३७४) इंडिकेटर सुरू केले. त्याकडे दुर्लक्ष करून मागून आलेल्या ट्रकने (सीजी.०४-एचएस.८७४०) त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली.

या झालेल्या अपघातात दुचाकीवरील संताेष यांचा जागीच मृत्यू झाला. तर सुनीता देखील जखमी झाल्या. मात्र, भावाचा रस्त्यावर पडलेला मृतदेह पाहून त्यांनी हंबरडा फोडला. यावेळी झालेल्या गर्दीचा फायदा घेत चालकाने घटनास्थळी ट्रक तसाच सोडून स्वत: पलायन केले. याप्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पाेलिस तपास करत आहेत.

हे देखील वाचा :

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button