जळगाव लाईव्ह न्यूज । ५ जानेवारी २०२२ । शहर आगारातील बस संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी व तहसीलदारांना निवेदन देत राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे स्वेच्छा मरणाची परवानगी मागितली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, एसटी कर्मचाऱ्यांची मानसिक स्थिती योग्य नाही. महाराष्ट्रातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या तुलनेत एसटी कर्मचाऱ्यांची आर्थिक स्थिती वाईट आहे. तुटपुंजे वेतन व मानसिक त्रासामुळे अनेक एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. आत्महत्या करणे कायद्याने गुन्हा असल्याने सर्व एसटी कर्मचाऱ्यांनी राज्यपालांकडे स्वेच्छा मरणाची परवानगी मागितली आहे. राज्याचे प्रमुख म्हणून एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीन करून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे सेवाज्येष्ठतेनुसार पदनिहाय वेतनश्रेणी देण्याची मागणी केली आहे. निवेदनावर २००हून अधिक कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिले आहे.

हे देखील वाचा :
- जळगावात आज वादळी पावसाची शक्यता, IMD कडून येलो अलर्ट जारी
- पाळधी-तरसोद महामार्गावरील पुलाच्या निकृष्ट कामाबाबत गुलाबराव पाटील यांनी दीड वर्षापूर्वीच केली होती तक्रार
- आसोदा उड्डाणपूल प्रकरणाची नितीन गडकरींकडून गंभीर दखल; दोषी ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करण्याचे निर्देश
- जळगावातील युवकांसाठी खुशखबर ; नामांकित कंपन्यांमध्ये इंटर्नशिपची संधी
- डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात ४० वर्षीय महिला शस्त्रक्रियेमुळे कॅन्सरमुक्त







