⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | नेहरू युवा केंद्राच्या सांस्कृतिक कार्यक्रमाला रसिकांची दाद

नेहरू युवा केंद्राच्या सांस्कृतिक कार्यक्रमाला रसिकांची दाद

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जानेवारी २०२२ । केंद्र शासनाचा उपक्रम असलेल्या नेहरू युवा केंद्र जळगावतर्फे आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात शहरातील विविध गटाकडून सांस्कृतिक नृत्य सादर करण्यात आले. कार्यक्रमाला उपस्थित स्पर्धक, रसिकांनी भरभरून दाद दिली.

नेहरू युवा केंद्र जळगाव आणि मू.जे.महाविद्यालय नृत्यकला विभागाच्या संयुक्त विद्यमाने आणि दिशा समाज प्रबोधन बहुद्देशीय संस्थेच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच जिल्हास्तरीय सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मू.जे.महाविद्यालयाचे प्राचार्य संजयभारंबे होते. व्यासपीठावर के.सी.ई.चे. प्रशासकीय अधिकारी शशिकांत वडोदकर, नूतन मराठा महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.एल.पी.देशमुख, नेहरू युवा केंद्राचे युवा अधिकारी नरेंद्र डागर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या उपस्थिती दीपप्रज्वलन करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने लागू केलेल्या निर्बंधामुळे कार्यक्रमाचे आयोजन छोटेखानीच करण्यात आले होते. कार्यक्रमात महाराष्ट्राची हास्य जत्राचे कलाकार प्रा.हेमंत पाटील, हलगी सम्राट नाटकाचेचे दिग्दर्शक हनुमंत सुरवसे यांना मानपत्र, स्मृतिचिन्ह देऊन विशेष सन्मान करण्यात आला. तसेच प्रभाकर संगीत कला अकादमीचा चमू, नृत्य कला विभाग प्रमुख अजय शिंदे, अमोल ठाकूर गुजराथी यांच्यासह सर्व संघांचा सन्मान करण्यात आला.

अध्यक्ष प्राचार्य भारंबे यांनी, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त नेहरू युवा केंद्र विविध उपक्रम राबवित आहे. युवा वर्गाच्या मनात राष्ट्रभक्तीचे बीज रोवण्याचा प्रयत्न नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून केले जाते. आपल्यातील कला जोपासण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावे, असे ते म्हणाले. प्रास्ताविक करताना नेहरू युवा केंद्राचे युवा अधिकारी नरेंद्र डागर म्हणाले, युवक देशाचे भविष्य आहे. आपल्या स्थानिक सांस्कृतिक कलेला वाव देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून सर्वांनी शासनाच्या निर्देशांचे पालन करावे, असे आवाहन डागर यांनी केले.

कार्यक्रमात सहभागी संघांनी आपल्या कलेचे प्रदर्शन केले. सूत्रसंचालन विनोद ढगे यांनी केले. कार्यक्रमासाठी नेहरू युवा केंद्राचे कोषागार अधिकारी अजिंक्य गवळी, स्वयंसेवक तेजस पाटील, दुर्गेश आंबेकर, हेतल पाटील, शुभांगी फासे, रवींद्र बोरसे, मनोज पाटील, मुकेश भालेराव, नेहा पवार, रोहन अवचारे, कल्पना पाटील, सुश्मिता भालेराव, किरण मेढे यांनी परिश्रम घेतले.

हे देखील वाचा :

author avatar
टीम जळगाव लाईव्ह