जळगाव लाईव्ह न्यूज । २ जानेवारी २०२२ । पाचोरा तालुक्यातील शिंदाड येथून जवळ असलेल्या पिंप्री प्र.लो. येथील अल्लाउद्दीन सांडू तडवी (वय ४२) या अल्पभूधारक शेतकऱ्याने कर्जबाजारी पणाला कंटाळून घराजवळील चिंचेच्या झाडाला गळफास केली. ही घटना शुक्रवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी पाेलिसांत नाेंद करण्यात आली आहे.
याबाबत असे की, अल्लाउद्दीन तडवी हा अल्पभूधारक शेतकरी असून दोन एकर शेतजमीन आहे. शेतजमीन कसून व मोलमजुरी करून हे कुटुंब आपला उदरनिर्वाह चालवत होते. परंतु यावर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे शेताचे उत्पन्न हाती आले नाही. कधीकधी आजारपण व इतर संकटात लागणारा खर्च यामुळे अल्लाउद्दीन हतबल झाला होता. म्हणून कुठूनतरी कर्ज काढून संसाराचा गाडा ओढायचा या हेतूने त्याने भारत फायनान्स, स्वतंत्र फायनान्स व ग्राम शक्ती फायनान्स या खाजगी फायनान्सच्या माध्यमातून कर्ज घेतले हाेते.
मोलमजुरी करुन कर्जफेड करू, अशी त्याची अपेक्षा होती. परंतु अपेक्षेप्रमाणे मजुरी मिळत नसल्याने घरसंसार चालवून बचत गटाचा हप्ता फेडणे मुश्कील झाले होते. परंतु नियमाप्रमाणे बचत गटाचा वसुली प्रतिनिधी कर्जवसुलीसाठी सतत तगादा लावून घराभोवती फिरत होते या सततच्या तगाद्याला ताे वैतागला हाेता. अल्लाउद्दीन याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची चर्चा सार्वे -पिंप्री गावामधील जनमानसात सुरू अाहे. या प्रकरणी पाेलिसांत नाेंद करण्यात आली असून अात्महत्येच्या नेमक्या कारणांचा पाेलिस तपास करत आहेत. अल्लाउद्दीन यांच्या पश्चात पत्नी, दाेन मुले, एक मुलगी सून असा परिवार आहे.
हे देखील वाचा :
- Jalgaon : चोरीच्या दुचाकी विक्रीसाठी जळगावात आला अन् फसला, पाच दुचाकी जप्त
- जळगाव जिल्ह्यात आणखी एक भीषण अपघात; टँकरची दुचाकीला धडक, दोन जण ठार
- जळगाव शहरातील हॉटेलमध्येच सुरु होता कुंटणखाना; पोलिसांनी छापा टाकताच..
- तलाठी हल्ला प्रकरणातील आरोपींना 24 तासांच्या आत अटक; जिल्हाधिकारींनी दिले कडक कारवाईचे आदेश
- जळगाव शहरात अपघाताची मालिका सुरूच: भीषण अपघातात महिलेचा मृत्यू