⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | जामनेर | पाचोरा-जामनेर पॅसेंजर सुरू करा : कृती समिती

पाचोरा-जामनेर पॅसेंजर सुरू करा : कृती समिती

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० डिसेंबर २०२१ । भुसावळ‎ रेल्वे प्रशासन पाचोरा ते जामनेर ‎(पीजे) ही ऐतिहासिक नॅरो गेज‎ पॅसेंजर गाडी बंद करण्याच्या‎ प्रयत्नात आहे. मात्र, पीजे बचाव‎ कृती समिती हा प्रयत्न हाणून‎ पाडेल. ही गाडी पूर्वीप्रमाणे तातडीने ‎सुरू करावी, अशी मागणी भुसावळ ‎विभागाचे डीआरएम‎ एस.एस.केडिया यांच्याकडे‎ निवेदनाद्वारे केली आहे.‎

निवेदनात म्हटले आहे की, कोरोना‎ महामारीमुळे २२ मार्च २०२० पासून‎ पाचोरा-जामनेर पॅसेंजर गाडी बंद‎ केली आहे. आता कोरोना स्थिती‎ नियंत्रणात आली आहे. तरीही पीजे‎ रेल्वे सुरू झालेली नाही. तसे प्रयत्न‎ देखील रेल्वे प्रशासनाकडून होताना‎ दिसत नाही. उलट पाचोरा- जामनेर‎ ‎रेल्वे मार्गावरील सर्व सुविधा‎ कायमस्वरुपी बंद करण्याचे प्रयत्न‎ सुरू आहेत. रेल्वे रूळ काढण्याचे‎ काम देखील सुरू होईल, अशी‎ चर्चा आहे. म्हणजेच पीजे गाडी बंद‎ करण्याच्या हालचाली आहे.‎ त्यासाठी डिझेल पंप बंद करणे,‎ पाचोरा-जामनेर मार्गावरील‎ वरखेडी, पिंपळगाव, पहूर, शेंदुर्णी,‎ ‎भागदरा, जामनेर या स्थानकावरील‎ कर्मचाऱ्यांची इतरत्र बदली‎ केल्याचा आरोप कृती समितीने‎ केला.

यावेळी कृती समितीचे‎ अध्यक्ष खलील देशमुख,‎ खजिनदार पप्पू राजपूत, सदस्य‎ प्रताप पाटील, अरुण पाटील,‎ देविदास पाटील, सचिन जाधव,‎ सुधाकर सोनवणे उपस्थित होते.‎

हे देखील वाचा :

author avatar
टीम जळगाव लाईव्ह