⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | भडगाव | परमेश्वराने केवळ मानवाला दिली‎ हास्याची देणगी : भंडारी‎

परमेश्वराने केवळ मानवाला दिली‎ हास्याची देणगी : भंडारी‎

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ डिसेंबर २०२१ । भडगाव‎ पृथ्वीच्या पाठीवर केवळ‎ मानवालाच हास्याची परमेश्वराने‎ ‎देणगी दिली‎ ‎ आहे, तिचा‎ ‎ मनमुराद उपयोग‎ ‎ केल्यास‎ ‎ मानवास चिंता,‎ ‎ त्रास यापासून‎ मुक्ती मिळू शकते. म्हणून प्रत्येकाने‎ हसले पाहिजे. हसणे हे निरोगी‎ आयुष्याची गुरुकिल्ली आहे.‎ मानवाच्या जीवनात असलेल्या‎ ताण-तणाव यावर हास्य हे जालीम‎ औषध आहे, असे प्रतिपादन राजेंद्र‎ भंडारी यांनी केले.‎

भडगाव येथील केशवसूत‎ ‎ज्ञानप्रबोधिनी आयोजित‎ व्याख्यानमालेत राजेंद्र भंडारी‎ बाेलत हाेते. व्यासपीठावर डॉ.‎ नीलेश पाटील, निवृत्त मुख्याध्यापक‎ सुनील पाटील, जिल्हा परिषद‎ सदस्य स्नेहा गायकवाड उपस्थित‎ होते. यावेळी भंडारी यांनी हास्याचे‎ विविध प्रकार उपस्थित श्रोत्यांकडून‎ प्रात्यक्षिक करून घेतले व त्यातून‎ मिळणारे लाभ सांगितले.‎ सूत्रसंचालन प्रा.डॉ. अतुल देशमुख‎ यांनी तर डॉ. विलास देशमुख यांनी‎ आभार व्यक्त केले. यावेळी भंडारी‎ म्हणाले की, महिला लवकर व‎ भरपूर हसतात व रडतात ही,‎ त्यामुळे त्यांच्यात पुरुषांपेक्षा‎ हृदयविकाराचे प्रमाण कमी आहे,‎ असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.‎

हे देखील वाचा :

author avatar
टीम जळगाव लाईव्ह