⁠ 
मंगळवार, एप्रिल 30, 2024

सावदा पालिका ऑफलाइन सभेत ३२ विषयांना मंजुरी

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ डिसेंबर २०२१ । सावदा नगरपालिकेची सर्वसाधारण सभा २२ रोजी संपन्न झाली.सलग दोन वर्षाचे कोरोना कालखंडानंतर न.पा.सभागृहात ही पहिलीच ऑफलाईन पद्धतीने झाली, यावेळी अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा अनिता येवले ह्या होत्या. यावेळी ही सभा जम्बो 32 विषयासह घेण्यात आली.विशेतः मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांची देखील ही पहिलीच ऑफलाईन सभा असणार होती मात्र, पालिकेतील नगराध्यक्षासह सभासदांची ही मात्र बहुधा शेवटची सभा आहे. ३० नंतर विद्यमान नगराध्यक्ष व नगरसेवक यांचा कालावधी संपणार आहे.

दरम्यान, 20 रोजी नवीन नगरपालिका सभागृहास प्रभाकर बुला महाजन यांचे नाव न दिल्यास सभेवर बहिष्कार टाकणार असल्याचे नगरसेवक राजेश वानखेडे यांनी सांगितले होते यामुळे यासभेकडे शहरवासीयांचे लक्ष लागले होते. दि. 22 रोजी सदर सभा सुरू झाल्यावर शहरातील कोचुर रोडवरील नवीन सभागृहास प्रभाकर बुला महाजन यांचे नाव देण्याचा ठराव संमत झाला. त्यामुळे राजेश वानखेडे यांनी केलेली मागणी पूर्ण झाली सोबत कोचुर रोडवरीलच जुन्या पालिका सभागृहास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देणे, स्टेशनरोड वरील जुन्या कन्याशाळेचे जागेवर होत असलेल्या व्यापारी संकुलास वैकुंठवासी ह.भ.प. जगन्नाथ महाराज अंजाळेकर यांचे नाव देण्याचे देखील सर्वानुमते ठरले, याच सोबत नवीन पाण्याची टाकी बांधणे साठी डेली भाजी मार्केट मधील जुन्या पाण्याचे टाकी खालील शेड काढणे सह सर्व 32 विषयांना यात मंजुरी मिळाली,

सभे दरम्यान नगरसेवक राजेश वानखेडे, राजेंद्र चौधरी, फिरोज खान पठाण, सिद्धार्थ बडगे, सतीश बेंडाळे, नगरसेविका रंजना भारंबे, नंदाबाई लोखंडे आदींनी चर्चेत सहभागी होऊन समनव्याने मार्ग काढीत सर्व विषय मंजूर केले, यावेळी उपनगराध्यक्ष विश्वास चौधरी, मुख्याधिकारी किशोर चव्हाण, यांचे सह नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते, तर सत्ताधारी गटातील गट नेते अजय भारंबे सभेस अनुपस्थित होते,

हे देखील वाचा :