⁠ 
रविवार, मे 19, 2024

२१ रुपये प्रति कि.मी.रिक्षा भाडे आकारणी करा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ डिसेंबर २०२१ । सध्या पेट्रोल, गॅसचे दर वाढले आहेत. त्यामुळे वाढती महागाई बघता २१ रुपये प्रती किलोमीटरप्रमाणे भाडे आकारण्यास मंजुरी द्यावी, त्याचबरोबर जनता व रिक्षाचालकांचा हिताचा निर्णय घ्यावा, अशी मागणी वीर सावरकर रिक्षा युनियनतर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

सविस्तर असे की, अनेक वर्षांपासून रस्त्यांच्या दुरवस्थेचा रिक्षाचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यात वाहनांसाठी येत असलेला मेंटेनन्स आणि चालकांच्या शरीराची होणारी झीज याचा विचार करायला प्रशासनाकडे वेळ नाही. सद्य:स्थितीला पेट्रोल, गॅसचे दर वाढले आहेत. त्यामुळे रिक्षाचालक जादा भाडे आकारत आहेत. रिक्षा चालवून उदरनिर्वाह होतो.

यावेळी पोपट ठोकळे, भानुदास गायकवाड, उत्तम सपकाळे, सुधाकर सपकाळे, विजय वानखेडे, प्रकाश पाटील, विठ्ठल जाधव, दादाराव इंगळे, अनिल निळे, सुखदेव जाधव, शशिकांत जाधव, विलास ठाकूर, कैलास विसपुते, मुकुंद सपकाळे, विलास ठाकूर, संजय सूर्यवंशी, नितीन माळी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

जनता व रिक्षाचालकांच्या हिताचा निर्णय घ्या

पुण्यात महागाई बघता २१ रुपये प्रती किलोमीटरप्रमाणे रिक्षाचालक भाडे आकारत आहेत. त्यामुळे जळगाव शहरातही २१ रुपये प्रती किलोमीटरप्रमाणे भाडे आकारण्यास मंजुरी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. प्रवासी रिक्षात बसताना अधिकृत रिक्षा स्टॉपवरून बसावे, जेणेकरून काही प्रमाणात फसवणूक होत असल्यास ती सुध्दा थांबेल. त्यामुळे जनता व रिक्षाचालकांच्या हिताचा निर्णय घेण्यात यावा, असे निवेदनात म्हटले आहे.

हे देखील वाचा :