⁠ 
सोमवार, मे 20, 2024

घरकुल योजनांच्या कामांना गती द्यावी – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज : 31 ऑक्टोबर 2023 : ग्रामीण भागात सुरू असलेल्या विविध घरकुल योजनांच्या कामांना गती देण्यात यावी. अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज येथे दिल्या. जिल्ह्यांत सुरू असलेल्या विविध घरकूल योजनांच्या कामांचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी आज घेतला. याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अनिकेत पाटील, तसेच जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री.प्रसाद म्हणाले, रमाई, शबरी आवास योजनेत १० नोव्हेंबर पर्यंत पहिला हप्ता वितरित झाला पाहिजे. प्रधानमंत्री आवास योजनेत लवकरात लवकर दुसरा व तिसरा हप्ता वितरित करण्यात यावा. कामांची वर्क ऑर्डर दिल्यानंतर लवकरात लवकर कामे सुरू करण्यात यावीत.  कामांचे लवकरात लवकर भूमिपूजन करण्याच्या दृष्टीने घरकुल योजनांच्या कामांना गती देण्यात यावी.

अनुसूचित जातीच्या वस्तींचा विकास करणे या योजनेच्या कामांना ही गती देण्यात यावी. पुढील दहा दिवसांत तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना भेटी द्याव्यात. अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.
हर घर जल, १५ वा वित्त आयोग निधी, महिला बचतगटांच्या योजनांचा आढावा ही यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला.