जळगाव लाईव्ह न्यूज । २४ डिसेंबर २०२१ । ऐकावे तर नवलच.. अमळनेर तालुक्यातील मांडळ गावात गेल्या १५ दिवसापासून आकाशातून पिवळ्या रंगाचे ठिपके पडत असल्याने याबाबत परिसरात कुतूहल निर्माण झाले आहे. काही तज्ज्ञांनी हा आम्लयुक्त पाऊस असल्याचे सांगितले आहे.

मांडळ येथे कोळी वाडा, आंबेडकर पुतळा व काही भागात पिवळ्या रंगाचे थेंब आकाशातून पडत असल्याने नागरिक गोंधळात पडले आहेत. काही ठिकाणी फरशीवर, दुचाकी तर एकाच्या चक्क मोबाइलवर या पिवळ्या रंगाचे ठिपके पडले आहेत. एका महिलेच्या अंगावर पिवळा थेंब पडला. त्या महिलेने त्याचा वास घेण्याचा प्रयत्न केला असता तिला उग्र दर्प जाणवला तसचे मळमळ होऊ लागले. याबाबत सुरेश कांबळे यांनी दखल घेऊन प्रांत सीमा अहिरे यांना ही माहिती कळवली. त्यानंतर त्यांनी उपविभागीय कृषी अधिकारी जाधवर यांना कळवून कृषी सहाय्यक ए. बी. पाटील यांना चौकशीसाठी पाठवले. मात्र तोपर्यंत ते पिवळे डाग कोरडे झाले होते. त्यामुळे त्याचा नमुने घेता आले नाही. दरम्यान, प्रा. दिनेश बोरसे यांनी हा आम्लयुक्त पाऊस असू शकतो, असे सांगितले.

हे देखील वाचा :
- गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये गणेशोत्सव स्पर्धांतून संस्कृतीचा जागर
- जळगाव रेल्वे स्थानकावरील कामाचा फटका; १२ गाड्या रद्द, अनेकांच्या वेळेत बदल
- मुंबईत लालबागच्या दर्शनासाठी गेलेल्या जळगावच्या तरुण अभियंत्याचा मृत्यू
- रब्बी ज्वारीसाठी शेतकऱ्यांना मोठा दिलासा! प्रमाणित बियाण्यांवर मिळणार अनुदान, कसा कराल अर्ज?
- पाण्याची चिंता काहीशी मिटली! जळगाव जिल्ह्यातील हे ७ प्रकल्प तुडुंब







