भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, दोन गंभीर
जळगाव लाईव्ह न्यूज । २३ डिसेंबर २०२१ । भुसावळ शहरापासून जवळच असलेल्या दीपनगर येथील उड्डाण पुलाजवळ भरधाव कारने दुचाकींना दिलेल्या धडकेत कैलास पाटील (रा.खडका, ता.भुसावळ) या तरुणाचा मृत्यू तर दिलीप पाटील व अन्य एक असे दोन जण गंभीर झाले आहेत.
सविस्तर असे की, काल रात्री रेल्वे उड्डाण पुलावर भुसावळकडून वरणगावकडे जाणार्या चारचाकीने दोन दुचाकींना जोरदार धडक दिली. यात ( एमएच १९ डीडी ४८३६ ) या क्रमांकाच्या दुचाकीवर स्वार असणारे कैलास शामसिंग पाटील (रा. खडका, ता. भुसावळ) हे जागीच ठार झाले. असून, दिलीप पाटील हे जखमी झाले आहेत. तर दुसर्या दुचाकीवरील व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही.
कैलास शामसिंग पाटील व दिलीप पाटील हे दीपनगर येथे कार्यरत होते. रात्री ड्युटी आटोपून ते घरी निघाले असतांनाच हा अपघात झाला. या अपघाताची माहिती मिळताच तालुका पोलीस स्थानकाच्या कर्मचार्यांसह फेकरी आणि दीपनगरसह परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्यास प्रारंभ केला. यातील दिलीप पाटील आणि दुसर्या व्यक्तीवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्या दुसर्या व्यक्तीची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. या संदर्भात पोलीसात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.
हे देखील वाचा :