जळगाव लाईव्ह न्यूज । २३ डिसेंबर २०२१ । रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी. कारण दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या बिलासपूर विभागात चौथ्या लाइनच्या कनेक्टिव्हिटीच्या कामासाठी रेल्वे प्रशासनाने ब्लाॅक घेतला आहे. यामुळे भुसावळ विभागातून बिलासपूर विभागात जाणाऱ्या तब्बल १८ गाड्या आज दि.२३ डिसेंबरपासून रद्द करण्यात आल्या आहेत. या गाड्या त्यांच्या नियोजित स्थानकावरून सुटणार नाही. त्यामुळे प्रवाशांचे आणि चाकरमान्यांचे हाल होऊ शकतात. या रद्द झालेल्या गाड्या कोणत्या आहेत, ते जाणून घ्या आणि तुमच्या प्रवासाची आखणी करता. अन्यथा हाल अटळ आहेत.
या गाड्या रद्द…
त्यात १२८७० हावडा-मुंबई २४ डिसेंबर, १२८६९ मुंबई-हावडा २६ डिसेंबर, १२८१२ हटिया-एलटीटी २४ व २५ डिसेंबर, २२८६६ पुरी-एलटीटी २८ डिसेंबर, एलटीटी-पुरी ३० डिसेंबर, १२८८० भुवनेश्वर-एलटीटी २३ व २७ डिसेंबर, एलटीटी-भुवनेश्वर २५ व २९ डिसेंबर, २२५१२ कामाख्य-एलटीटी २५ डिसेंबर, एलटीटी-कामाख्य २८ डिसेंबर, १२८१० हावडा-मुंबई २६ डिसेंबर, मुंबई-हावडा २८ डिसेंबर, १२१५१ एलटीटी-शालीमार एक्स्प्रेस २२, २३ व २९, तर शालिमार-एलटीटी ही गाडी २४, २५ व ३१ डिसेंबर, १२९४९ पाेरबंदर-सांत्रागाची २४ व सांत्रागाची ते पाेारबंदर गाडी २६ डिसेंबर, २२८९४ ही हावडा-साईनगर शिर्डी गाडी २३ व ३०, साईनगर शिर्डी ते हावरा एक्स्प्रेस २५ डिसेंबर आणि १ व २२ या दिवशी रद्द केली अाहे.
आजपासून १३ रेल्वे गाड्या सुरळीत
दरम्यान, दुसरीकडे भुसावळ विभागातील नांदगाव रेल्वे स्थानकावर मंगळवार व बुधवार (२१ व २२) पादचारी पुलाच्या कामासाठी दोन दिवस दुपारी १.१५ ते सायंकाळी ५.१० या वेळात ब्लाॅक घेतला हाेता. यामुळे अप-डाऊन मार्गावरील तब्बल १३ रेल्वे गाड्या विभागातील विविध स्थानकांवर थांबवण्यात आल्या. मात्र, आज गुरुवारपासून या गाड्या सुरळीत धावतील
.
नांदगाव रेल्वे स्थानकावरील पादचारी पुलाचे काम प्रशासनाने हाती घेतले होते. त्यासाठी २१ व २२ डिसेंबरला प्रत्येकी चार तासांचा ब्लाॅक घेण्यात आला. दुपारी १.१५ ते सायंकाळी ५.१० या वेळेतील ब्लॉकमुळे अप-डाऊन मार्गावरील १३ गाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत झाले. यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली. यात अप मार्गावरील न्यू दिल्ली-बंगळुरू एक्स्प्रेस ही गाडी पिंपरखेड, प्रयागराज-एलटीटी ही गाडी न्यायडोंगरी, हावडा-मुंबई एक्स्प्रेस हिरापूर, लखनऊ-मुंबई एक्स्प्रेस चाळीसगाव, हावडा-मुंबई एक्स्प्रेस वाघळी, वाराणसी-एलटीटी कजगाव, तर डाऊन मार्गावरील बंगळुरू-न्यू दिल्ली एक्स्प्रेस हिसवळ, एलटीटी-छपरा एक्स्प्रेस (मंगळवार, गुरूवार व शनिवार) मनमाड, नांदेड-निजामुद्दीन (मंगळवार) व यशवंतपूर-चंदीगड ही गाडी मनमाड, मुंबई-पटना (मंगळवार, शुक्रवार) ही गाडी समीट, एलटीटी-जयनगर एक्स्प्रेस लासलगाव, एलटीटी-कामाख्य एक्स्प्रेस निफाड, एर्नाकुलम-निजामुद्दीन एक्स्प्रेस कसबे सुकेने या स्थानकावर थांबवली हाेती.
हे देखील वाचा :
- भयकंर! जळगावात चिमुकलीला गळफास देऊन आईनेही संपविलं जीवन
- निकालानंतर अजित पवारांची मोठ्या पदावर वर्णी
- निवडणूक झाली; आता लाडक्या बहिणींच्या खात्यावर डिसेंबरचे पैसे कधी येणार?
- उद्या महायुतीचा शपथविधी? संभाव्य मंत्र्यांची नावे समोर, जळगावातील या आमदारांचा समावेश?
- महायुतीत मुख्यमंत्री निवडीसाठी मोठ्या हालचालींना वेग; कोण होणार मुख्यमंत्री?