जळगाव लाईव्ह न्यूज । २२ डिसेंबर २०२१ । विभागातील एसटी कर्मचाऱ्यांना वारंवार सूचना देवूनही कामावर हजर न होणाऱ्या एसटी महामंडळाच्या ४१ कर्मचाऱ्यांवर आतापर्यंत बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे. मात्र, अद्यापपर्यंत कर्मचाऱ्यांनी आपले आंदोलन सुरुच ठेवले आहे. मंगळवारीही नऊ कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई झाली.

आजपर्यत ३५० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांवर निलंबनासह ८६ कर्मचाऱ्यांना सेवासमाप्तीची नोटीस बजावण्यात आली आहे. निलंबित कर्मचाऱ्यांना बडतर्फीच्या नोटीस देवून आठ दिवसांत खुलासा सादर न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर ही कारवाई केली जात आहे. कनिष्ठ वेतनश्रेणी कर्मचाऱ्यांनी संपातून माघार घेतली आहे. कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांवरील कारवाईचे आदेश मागे घेण्यात येणार असल्याचे सांगितले जाते आहे. यानंतरही कर्मचारी मागण्यांवर ठाम आहेत. कामावर रूजू न होणाऱ्यांवर कठोर कारवाईचे संकेत प्रशासनाने दिले आहेत.

विलिनीकरणाच्या मागणीबाबत बुधवारी न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यात काय निकाल लागताे? याकडे एसटी कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे. याची प्रवाशांनीही उत्सुकता आहे.
हे देखील वाचा :
- जळगाव जिल्ह्यावासीयांसाठी खुशखबर! गिरणा धरणाची जलपातळी ८६ टक्क्यांवर पोहोचली!
- महादेव हॉस्पिटलमध्ये जन्मजात हृदयातील छिद्रावर अत्याधुनिक डीव्हाईस क्लोजर शस्त्रक्रिया यशस्वी
- चिंचोली उपकेंद्रात ५ एमव्हीए अतिरिक्त ट्रान्सफॉर्मरचे पालकमंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते लोकार्पण
- आषाढी एकादशीनिमित्त बालरंगभूमी परिषदेतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन
- जळगाव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळणार; वाचा पुढील 5 दिवसाचा हवामान अंदाज?







