जळगाव लाईव्ह न्यूज । २२ डिसेंबर २०२१ । काेराेना (Corona) लॉकडाउनपासून (Lockdown) बंद झालेली भुसावळ-देवळाली (Bhusawal- Deolali) शटल आता तब्बल दीड वर्षानंतर सुरू हाेण्याचे संकेत आहे. त्यासाठी हालचाली देखील सुरु असून शक्य झाल्यास आठवडाभरात ही गाडी सुरू होऊ शकते. दरम्यान, ही गाडी सुरू करताना पासधारकांना देखील परवानगी द्यावी, अशी मागणी आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील गेल्या जवळपास २ वर्षांपासून पॅसेंजर गाड्या बंद आहे. कोरोना नियंत्रणात आल्यानंतर मागील गेल्या काही दिवसापूर्वी भुसावळ- बडनेरा, भुसावळ-इटारसी या दाेन मेमू गाड्या सुरू करण्यात आल्या. त्यानंतर भुसावळ-मुंबई मार्गावर पॅसेंजर गाडी कधी सुरू हाेते? याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, या मार्गावर देखील आता पॅसेंजरऐवजी मेमू चालवण्याच्या हालचाली आहेत.
त्यासाठी डीआरएम कार्यालयाकडून मुख्यालयाकडे दोनवेळा देवळाली मेमू गाडी सुरू करण्याचे प्रस्ताव पाठवले आ हेत. त्यावर लवकरच निर्णय अपेक्षित आहे. शक्य झाल्यास आठवडाभरात ही गाडी सुरू होऊ शकते. दरम्यान, ही गाडी सुरू करताना पासधारकांना देखील परवानगी द्यावी, अशी मागणी आहे.
हे देखील वाचा :
- जळगावकरांचे प्रचंड आभारी आहे; “हॅट्ट्रिक” साधून विजयी झाल्यानंतर आ. राजूमामांची प्रतिक्रिया
- जळगाव ग्रामीणमध्ये गुलाबराव पाटीलांचा पुन्हा विजय ; विरोधकांना चारली धूळ
- जळगाव शहरातून राजूमामा भोळे यांची विजयी हॅट्रिक
- महाराष्ट्र्रात पुन्हा महायुतीचे सरकार; ‘या’ 5 मुद्द्यांमुळे मिळाला विजय..
- जळगाव जिल्ह्यात मविआला धोबीपछाड! सर्वच ११ जागांवर महायुतीचा विजय निश्चित