⁠ 
शनिवार, मे 18, 2024

जेठ-जेठाणीच्या जाचास कंटाळून विवाहितेची आत्महत्या

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ डिसेंबर २०२१ । बहिणीचा जेठ मारहाण व शिविगाळ करत असल्यामुळेच, माझ्या बहिणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची तक्रार विवाहितेच्या भावाने केली. त्यामुळे एरंडोल पोलिसांनी मृत विवाहितेचे जेठ, जेठाणी यांच्यासह अन्य दोन अशा चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

फिरोजा पिंजारी यांचा विवाह २००८ मध्ये एरंडोल येथील अकिल अब्दुल पिंजारी यांच्याशी झाला होता. फिरोजा यांना एक मुलगा आणि दोन मुली आहेत. मेहुणे अकील पिंजारी हे भाऊ शकील पिंजारी यांच्यासोबत एकत्र एकाच इमारतीमध्ये राहत होते. बहिणीचा जेठ शकील पिंजारी हा नेहमी बहिणीकडे शरीर सुखाची मागणी करत होता. मात्र बहिणीचा संसार तुटू नये यासाठी माहेरचे तिची समजूत घालत होते.

१९ नोव्हेंबरला मेहुणे अकील पिंजारी हे कामानिमित्त गुजरातला गेले होते. २० नोव्हेंबरला जेठ शकील पिंजारी हा फिरोजा यांच्याशी भांडला. २१ नोव्हेंबरला शकील पिंजारी याने त्याचा शालक समशोद्दीन मजीद पिंजारी (रा.गिरड, ता.भडगाव) व त्याची पत्नी अनिसा समशोद्दिन पिंजारी यांना बोलावून घेतले. जेठ शकील पिंजारी, त्याची पत्नी शाहीन, समशोद्दीन पिंजारी आणि अनिसा पिंजारी यांनी फोरोजाला मारहाण केली. त्यानंतर फिरोजा यांनी गळफास घेतल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

दफनविधी झाल्यानंतर भाची आसमा हिने मामाला घटना सांगितली. वडील बाहेरगावी गेल्यानंतर काका व काकू नेहमी आईशी भांडण करत होते. त्यांच्या जाचाला कंटाळूनच बहिणीने आत्महत्या केल्याची तक्रार रफिक पिंजारी यांनी दिली. त्यानुसार जेठ शकील पिंजारी, जेठाणी शाहीन, समशोद्दिन पिंजारी व अनिसा पिंजारी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला.

हेही वाचा :