जळगाव लाईव्ह न्यूज । २० डिसेंबर २०२१ । धर्मादाय रुग्णालयांना त्यांच्या नावामध्ये अथवा नावासमोर धर्मादाय असा उल्लेख करावा, तसेच गरीब आणि गरजू रुग्णांसाठीच्या योजनांचे फलक दर्शनी भागात लावावे, अशी मागणी आरोग्य सहायक समितीतर्फे साहायक धर्मादाय आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
धर्मादाय आयुक्तांनी राज्यातील धर्मादाय रुग्णालयांना त्यांच्या नावामध्ये अथवा नावासमोर ‘धर्मादाय अथवा चॅरिटेबल’ हा शब्द नमूद करण्यास, तसेच प्रसिद्ध करण्यासाठी आदेश दिले आहेत. या आदेशानुसार आरोग्य सहायक समितीने जळगाव जिल्ह्यासह रुग्णालयांमध्ये इतर या शहरातील आदेशाची अंमलबजावणी होत नसल्याचे निदर्शनास आले आहे.

तसेच जिल्ह्यातील काही धर्मादाय रुग्णालयांनी गरीब आणि गरजू रुग्णांसाठी शासनाकडून वेळोवेळी लागू केलेल्या विविध योजनांची माहिती देणारे फलक, आरोग्य सुविधा आदी प्रसिद्धी फलक लावले नसल्याचे निदर्शनास आले आहे.
हे देखील वाचा :
- सणासुदीच्या तोंडावर सोन्याच्या दरांनी पुन्हा घेतली उसळी; जाणून घ्या आजचे नवे दर
- नशिराबाद टोलनाक्याजवळ भीषण अपघात; २७ वर्षीय तरुण जागीच ठार
- अमळनेरात रिक्षा पलटून महिलेचा मृत्यू, सहा जण जखमी; रिक्षाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल
- सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीने घेतली उसळी ! जाणून घ्या आजचे ताजे दर
- जळगावातील महामार्गावर पुन्हा भीषण अपघात; टँकरच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू








