⁠ 
गुरूवार, सप्टेंबर 19, 2024
Home | जळगाव जिल्हा | यावल | यावलात‎ आढळली पुरातन विहीर‎

यावलात‎ आढळली पुरातन विहीर‎

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २० डिसेंबर २०२१ । यावल‎ शहरात पालिकेकडून जलवाहिनी टाकली‎ जाणार आहे. त्यासाठी खोदकाम‎ करताना एक पुरातन विहीर‎ आढळली. ही विहीर‎ सुमारे ४० ते ५० फूट खोल असेल असा अंदाज आहे.या विहिरीचा पंचनामा‎ करून पालिकेच्या माध्यमातून ती‎ बुजवण्यात येइल,असे आश्वासन‎ प्रभारी नगराध्यक्षांनी दिले.‎

शहरात विविध भागामध्ये‎ पाइपलाइनचे काम सुरू आहे. या‎ दरम्यान शहरातील मध्यवस्तीत‎ असलेल्या खिर्णीपुरा भागात शेख‎ इब्राहिम शेख चाँद यांच्या घराजवळ‎ ‎ खोदकाम सुरू होते. त्यात एक‎ पुरातन विहीर आढळली. ही विहीर‎ सुमारे ४० ते ५० फूट खोल असेल असा प्राथमिक अंदाज‎ आहे.

ही माहिती कामगार व‎ भागातील नागरीक मझहर शेख‎ सैफुद्यीन, शेख रफीक शेख‎ फारूख, आसिफ खान समशेर‎ खान, इद्रिस खान इसा खान यांनी‎ प्रशासनास दिली. यानंतर प्रभारी‎ नगराध्यक्ष अभिमन्यू चौधरी,‎ तलाठी ईश्वर कोळी, दादू धोत्रे यांनी‎ भेट पंचनामा करण्यास सांगितले.‎ तसेच रस्त्यात असलेली ही विहीर‎ पालिकेच्या वतीने बुजवण्यात येईल‎ असे आश्वासन दिले.‎

हे देखील वाचा :

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.