जुन्यवादातून दोघांना बेदम मारहाण; एका विरोधात गुन्हा दाखल

डिसेंबर 19, 2021 3:25 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ डिसेंबर २०२१ । जामनेर शहरातील जामनेर पुरा भागात जुन्यवादातून दोन जणांना बेदम मारहाण केल्याची घटना १७ रोजी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास घडली.या प्रकरणी येथील पोलीसात एकावर गुन्हा दाखल झाला आहे.

crime 5 jpg webp

सविस्तर असे की, दिपक दामू कचरे (वय-४१) रा. जामनेर पुरा, जामनेर हा तरूण मजूरी करून उदरनिर्वाह करतो. १७ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास शहरातील विवेकानंद भागात त्याचा मित्र उल्हास नेमाडेसह चर्चा करत होते. त्याचवेळी अजय उर्फ अशोक वाल्मिक लोहार रा.विवेकानंद नगर, जामनेर हा आला. त्याने जुन्या वादातून दोघांना शिवीगाळ व मारहाण केली. या मारहाणीत दिपक कचरे याच्या हाताला गंभीर दुखा केली. याप्रकरणी दिपक कचरे यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी अशोक लोहार याच्याविरोधात जामनेर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विजेंद्र पगारे हे करीत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now