जळगाव लाईव्ह न्यूज । १८ डिसेंबर २०२१ । भरधाव रेल्वेच्या धडकेत एका अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना जळगाव तालुक्यातील भादलीजवळ घडली. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जळगाव ते भादलीच्या दरम्यान शुक्रवार १६ डिसेंबर रोजी दुपारी खंबा क्रमांक ४२४ /३ ते ४२५/५ यादरम्यान रेल्वेरुळावर एक अनोळखी व्यक्ती रेल्वेतील चालकाला दिसून आला. चालकाने हार न वाजवल्यानंतरही तो बाजूला झाला नाही. यानंतर धावत्या रेल्वेच्या खाली येऊन त्याचा मृत्यू झाला.
भादली येथील स्टेशन मास्तर ब्रिजेश कुमार यांच्याकडुन घटनेची माहिती मिळाल्यावर तालुका पोलिस ठाण्यातील कर्मचार्यांनी घटनास्थळ गाठून मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल साहेबराव पाटील हे करीत आहेत. मयताचे वय अंदाजे ३५ ते ४० वर्ष असून त्याची ओळख पटविण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.