चक्क लोटगाडीवर दारू विक्री, ५ जणांविरुद्ध गुन्हा
जळगाव लाईव्ह न्यूज । १८ डिसेंबर २०२१ । शहरातील गुजराल पेट्रोल पंप व सिव्हील हॉस्पिटल परिसरात अंडापाव लोटगाडीवर विनापरवाना दारू विक्री करणाऱ्यावर पोलिसांनी १७ रोजी रात्री १० वाजता धडक कारवाई केली असता.कारवाईत पाच जण दारू विक्री करताना आढळून आले. त्या पाचिंवर जिल्हापेठ पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.
सविस्तर असे की, जिल्हा पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंडापाव, चिकन फ्राय हातगाडीवर विनापरवाना दारू विक्री होत असल्याची गोपनिय माहिती पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांना मिळाली. त्यानुसार शुक्रवार १७ डिसेंबर रोजी रात्री १० वाजता शहरातील गुजराल पेटोल पंपाजवळील एनएन वाईन शॉप समोर अंडापाव, भुर्जी विकणाऱ्या संशयित आरोपी योगेश कैलास चौधरी रा. पिंप्राळा यांच्यावर कारवाई करत दारू हस्तगत केली. तर दुसऱ्या कारवाईत जिल्हा रुग्णालयात जवळील बी.जे.मार्केट परिसरातील चिकन फ्राय हातगाडीवर दारू विकतांना तीन दुकानदार आढळून आले. यात मनोज शिवाजी पाटील, गोपाळ मधूकर चौधरी आणि प्रकाश भगवान चौधरी तिघे रा. कासमवाडी जळगाव यांच्यावर कारवाई करत तीन हातगाडी दुकान व दारू हस्तगत करण्यात आली आहे.
यांनी केली कारवाई
पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि महेंद्र वाघमारे, सपोनि देशमुख, पोहेकॉ मनोज पवार, महेंद्र पाटील, तुषार जावरे, पोना संतोष सोनवणे, पोना गणेश पाटील, योगेश साबळे, समाधान पाटील, विकास पहुरकर, विनोद पाटील, अमित मराठे, माधव कांबळे, जुबेर तडवी, यांनी कारवाई केली आहे.