प्रवाशांनो लक्ष द्या! भुसावळ विभागातील ‘या’ आठ रेल्वेगाड्या रद्द
जळगाव लाईव्ह न्यूज । १८ डिसेंबर २०२१ । ठाणे ते दिवा विभागादरम्यान मुख्य रेल्वे मार्गावर काही महत्वाच्या कामामुळे भुसावळ विभागातून जाणाऱ्या आठ रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
या गाड्या रद्द
रद्द करण्यात आलेल्या गाड्या अशा आहेत. ट्रेन क्र. १२११० मनमाड मुंबई पंचवटी एक्सप्रेस, रविवार १९ रोजी, १२०७१ मुंबई जालना एक्सप्रेस ट्रेन क्रमांक १२०७२ जालना मुंबई एक्सप्रेस (दोन्ही गाड्या रविवारी रह), १२१०९ मुंबई मनमाड पंचवटी एक्सप्रेस रविवारी रद्द, १२१११ मुंबई- अमरावती एक्सप्रेस रविवारी, १२११२- अमरावती – मुंबई एक्सप्रेस शनिवारी रद्द, १७६११ नांदेड मुंबई राज्यराणी एक्सप्रेस शनिवारी रद्द, १७६१२ मुंबई नांदेड राज्यराणी एक्सप्रेस रविवारी रद्द करण्यात आली आहे.
मध्य रेल्वे मार्गावरील उपनगरीय रेल्वेच्या फेऱ्या वाढाव्यात यासाठी एमआरव्हीसीकडून ठाणे ते दिवा या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम सुरू आहे. या मार्गाच्या कामासाठी रविवारी१८ तासांचा मेगाब्लॉक घेण्याचे नियोजन आहे. त्यामुळे लोकल, मेल आणि एक्स्प्रेसच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. मेल, एक्स्प्रेस गाड्यांसाठी स्वतंत्र मार्गिका उपलब्ध करतानाच लोकलचे वेळापत्रक सुरळीत करण्यासाठी ठाणे ते दिवा दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गाच्या कामाला मुंबई रेल्वे विकास महामंडळ आणि मध्य रेल्वेकडून गती दिली जात आहे.