गुन्हेजळगाव जिल्हाजळगाव शहर
मुलीवर अत्याचार करणा-या संशयिताचा जामीन नाकारला!
जळगाव लाईव्ह न्यूज । १८ डिसेंबर २०२१ । शहरातील रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारा विनोद लोंढे याने कचरा फेकण्यासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता घडली होती.या प्रकरणी संशयित तरुणाने जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. त्यावर शुक्रवारी कामकाज होवून न्यायालयाने सुनावणीअंती जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.
विनोद लोंढे याने दिवसभर मुलीला घरात डांबून ठेवल्यानंतर सायंकाळी तिला तिच्या घराजवळ सोडून दिले होते. मुलीने ही संपूर्ण घटना आईला सांगितली.