जळगाव जिल्हाजळगाव शहर

२ जानेवारीला होणार लेवा पाटीदार समाजातील विवाहेच्छुक युवक-युवती परिचय संमेलन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ डिसेंबर २०२१ । अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघ बहिणाई ब्रिगेड व लेवा सखी घे भरारी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २ जानेवारी २०२२ रोजी लेवा भवन जळगाव येथे लेवा पाटीदार समाजातील विवाहेच्छुक युवक-युवती परिचय संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर सदर कार्यक्रमाच्या नियोजनासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन १५ रोजी आशाताई कोल्हे यांच्या निवासस्थानी करण्यात आले.या बैठकीत विविध समित्यांचे गठन करण्यात आले. या परिचय संमेलनाला महाराष्ट्रातून व बाहेरील राज्यातून युवक-युवती आपल्या पालकांसोबत हजर राहणार आहे. यावेळी परिचय संमेलनात पालकांची प्रत्यक्ष भेट व चर्चा करण्यासाठी वेगवेगळ्या दालनांची निर्मिती करण्यात येणार आहे. संमेलनात युवक-युवती व पालकांना प्रवेश विनामूल्य असुन,भोजन व्यवस्था देखील मोफत करण्यात येणार आहे. बैठकीत सदर परिचय संमेलन यशस्वी पार पाडण्यासाठी सविस्तर चर्चा व विचार विनिमय करण्यात आला.

याप्रसंगी अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष ऍड.प्रकाशराव पाटील, प्रदेशाध्यक्ष प्रदीप भोळे, बहिणाई ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षा आशाताई कोल्हे,प्रदेश उपाध्यक्षा हर्षाताई बोरोले, जिल्हाध्यक्षा सुनीताताई येवले, महानगराध्यक्ष साधनाताई लोखंडे,लेवा सखी घे भरारी च्या अध्यक्षा ऍड.भारतीताई ढाके,कांचन राणे,वनिता चौधरी,  कांचन आटाळे,पुष्पा पाटील,सविता भोळे,वैशाली झोपे,सोनाली पाटील,मनीषा चौधरी,जया राणे,अंजली नारखेडे, भावना महाजन,चित्रा महाजन,वैशाली कोळंबे,भारती चौधरी,निलिमा किनगे,स्मिता पाटील अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघाचे जिल्हा कार्याध्यक्ष अमोल कोल्हे,प्रदेश सदस्य निखिल रडे,महानगराध्यक्ष अतुल महाजन, योगेश इंगळे,अविनाश मोरे,सागर महाजन,शक्ती महाजन,संजय पाटील,राकेश चौधरी,गुणवंत झोपे,ऍड.प्रसाद ढाके, चिन्मय आटाळे,विवेक जावळे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button