जळगावातील मूलभूत सुविधांबाबत राष्ट्रवादीतर्फे आयुक्त, महापौरांना निवेदन

डिसेंबर 16, 2021 1:44 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ डिसेंबर २०२१ । शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टितर्फे अस्वच्छता,पाणीपुरवठा, दिवाबत्ती,आरोग्य,घनकचरा प्रकल्प,खड्डेयुक्त रस्ते,अमृत योजना तसेच महानगरपालिकेतील भ्रष्टाचार अशा विविध विषयांवर महानगरपालिकेच्या आवारात धरणे आंदोलन करून घोषणाबाजी केली.तर सदरचे निवेदन महानगरपालिका आयुक्त व महापौर यांना देण्यात आले.

राष्ट्रवादीचे निवेदन jpg webp

महानगरपालिका आयुक्त यांच्या वतीने उपायुक्त शयाम गोसावी यांनी निवेदन स्वीकारले व आंदोलकांशी चर्चा केली सत्ताधाऱ्यांच्यावतीने माजी महापौर विष्णू भंगाळे व विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनीही आंदोलकांशी चर्चा केली. सदर निवेदनाची दखल घेऊन लवकरच योग्य उपाययोजना करण्यात येतील असे उपायुक्त गोसावी यांनी आंदोलकांना आश्वासन दिले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष ऍड.भैय्या रवींद्र पाटिल,महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी,प्रदेश सरचिटणीस नामदेवराव चौधरी,महिला महानगर अध्यक्ष मंगला पाटिल,वाल्मिक पाटिल,अशोक पाटिल,राजू मोरे, सुनील माळी,डॉ.रिजवान खाटिक,अमोल कोल्हे,कल्पिता पाटिल,दिलीप माहेश्वरी,रमेश बाऱ्हे,ऍड.राजेश गोयर,सुशील शिंदे,विशाल देशमुख,किरण राजपूत,रहीम तडवि,भगवान सोनवणे,राहुल टोके,किरण चव्हाण,अनिल पवार,जुबेर खाटिक,जितू बागरे,हर्षवर्धन खैरनार,पंकज वाघ,किरण चव्हाण,सिदार्थ गव्हाणे,महेंद्र टेकावडे आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now