जळगाव लाईव्ह न्यूज । १६ डिसेंबर २०२१ । अर्धवेळ परिचारिका मागील सहा महिन्यांपासून मानधनापासून वंचित आहेत. प्रशासनाने तातडीने लक्ष घालून रखडलेल्या मानधनाचा प्रश्न मार्गी लावावा, अशी त्यांनी मागणी केली आहे.
धानोरा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत चार उपकेंद्रे आहेत. त्यात काही अर्धवेळ परिचरीका आहेत. त्यांच्या कडून लसीकरणासह इतर आरोग्य सेवा अर्धवेळ परिचरीका अत्यल्प मानधनात करीत आहेत. परंतु गेल्या सहा महिन्यांपासून मानधन मिळाले नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय अधिकारी, आरोग्यसेवक, आरोग्य सेविका, आशासेविका यांच्या समवेत अर्धवेळ परिचारीकाही झोकून देऊन काम करीत आहेत. तरीही शासनाने त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले आहे. जिल्ह्यातील बहुतांश अर्धवेळ परिचारीकांना गणवेश, ओळखपत्रही दिले नाही. राज्यशासनाने अलीकडेच आशा स्वंयसेविकांच्या मानधनात वाढ केली आहे. परंतु अर्धवेळ परिचारीकांचा प्रश्न अधांतरी ठेवला आहे.
स्त्री परिचारिका या अत्यल्प मानधनात काम करीत आहेत. तरी अद्याप सहा महिन्यांचे मानधन मिळले नाही. शासनाने मानधन वाढवून आम्हाला पूर्ण वेळ सेवेत समावेश करून घ्यावा.
पुष्पा ठाकुर, परिचारिका
गेल्या सहा महिन्यांपासून मानधन नाही. त्यामुळे परिस्थिती बिकट होत आहे. आतापर्यंत झालेल्या लसीकणाचे परिचरीकांना मोबदला मिळाला नाही. शासने आमच्या समस्या सोडवून लवकर आमचे थकलेले मानधन द्यावे.
-ज्योती बोदडे, परिचारिका