गुन्हेबातम्यायावल

वनविभागाने केलेल्या कार्यवाहीत हजारो रुपयांचे सागवान लाकुड व रंधा मशिनसह साहित्य जप्त

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । अमीर पटेल । वृक्षांची कत्तल करणे हा एक गुन्हा असून देखील अनेक लोक सर्रासपणे वृक्षतोड करतात. यावल शहराला लागून सलेल्या सुतगिरणी परिसरात वनविभागाने केलेल्या कार्यवाहीत हजारो रुपये किमतीचा सागवान लाकुड जप्त केल्याची घटना घडली असुन, सातपुडा जंगलातुन गैर मार्गाने मोल्यवान वृक्षांची कत्तल करणाऱ्या मध्ये एकच खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी वनक्षेत्राच्या सुत्रांकड्डन मिळालेली माहीती अशी की शुक्रवार दि. १० रोजी संद्याकाळी ६ वाजेच्या सुमारास सहाय्यक वनसंरक्षक यावल पी.व्ही.हाडपे आणि यावल पुर्व आणि यावल पश्चिम वनक्षेत्रातील क्षेत्रीय अधिकारी विक्रम पदमोर यांच्या मार्गदर्शनाखाली वनकर्मचारी वनपाल,वनरक्षक, पोलीस नाईक,वाहनचालक यांच्या पथकाने संयुक्तरित्या मिळालेल्या गुप्त माहीतीच्या आधारे यावल शहरातील उत्तर क्षेत्रात सुतगिरणीच्या परिसरात फरार आरोपी अरशद शेख याच्या मालकीचे पत्र्याच्या शेडमध्ये विनापरवाना अवैध रित्या रंधामशिन, लाकूड चिरकाम करण्याचे आणि फर्निचर तयार करण्यासाठी उपयोगात असलेले इतर साहित्यसह  १० नग ०.११० घन मीटर सागवान लाकूड व ६५००० हजार रुपये किंमतीचा मद्देमाल जमा केला.

१९२७ भारतीय वन अधिनियमा नुसार आढळून आलेला मुद्देमाल जप्त करित आरोपी विरुध्द वनपाल डोंगरकठोरा तालुका यावल येते गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या गुन्ह्यातील पुर्वीपासुनच अरशद शेख या फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी यावल पुर्व यांची पथके तयार करण्यात आले आहे असल्याची माहीती वनपरिक्षेत्र अधिकारी विक्रम पदमोर यांनी दिली आहे.

Related Articles

Back to top button